Akshaya Tritiya 2023:  हिंदू पंचांगात साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. याच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असेलेला मुहूर्त म्हणजे अक्षय्य... अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya 2023)  घरगुती सण समारंभापासून ते सोनं (Gold)  खरेदीपर्यंतच्या गोष्टी या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन केल्या जातात. असं म्हटलं जातं की अक्षय्य तृतीयेचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि समृध्दी घेऊन येतो. यादिवशी लक्ष्मीचे पूजन (Laxmi pooja)  केले जाते तसेच सोने- चांदीच्या (Silver And Gold)  वस्तूंची खरेदी देखील केली जाते. तर  जाणून घेऊया काय आहे अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीचं विशेष महत्त्व आहे. 


अक्षय्य  तृतीयेला खरेदी करण्याचा योग्य मुहूर्त कोणता? 


22 एप्रिलला सकाळी 7.49  ते 23 एप्रिल सकाळी 7.47 मिनिटांपर्यंतचा  मुहूर्त हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे. 


अक्षय्य  तृतीयेला कोणत्या गोष्टींची खरेदी कराल?


अक्षय्य  तृतीयेला सोने - चांदीचे दागिने तसेच जमीन,वास्तू, गाडी,तांत्रिक गोष्टी आदी गोष्टींची तुम्ही खरेदी करू शकता. तसेच काही  मौल्यवान गोष्टींची खरेदी केल्यास दीर्घ कालावधीसाठी त्या शुभ ठरतात


सोन्याशिवाय अजून कोणत्या गोष्टींची खरेदी करू शकता?


खरंतर सोने खरेदी या दिवशी अतंत्य शुभ असते. परंतु जर काही कारणास्तव जर तुम्ही सोने खरेदी करू शकला नाहीत, तर आणखी काही गोष्टी देखील आहेत. ज्यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धि येऊ शकते. या गोष्टींमुळे तुम्हाला कुबेराचे आशिर्वाद देखील मिळतील. दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र,गहू, मडके,शिंपले या सर्व गोष्टी लक्ष्मी मातेला प्रिय आहेत असे मानलं जातं. तसेच यातील गहू हे सृष्टीतील प्रथम अन्न मानले जाते. धार्मिक पुराणानुसार गहू हे भगवान विष्णूचे प्रतिक देखील मानले जाते. यादिवशी घरात गहू पुजल्याने लक्ष्मीमाता प्रसन्न होईल. 


काय आहे अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya 2023)  सोनं खरेदीचं महत्त्व?


पौराणिक कथांनुसार वैशाख शुक्ल तृतीयेला ब्रह्मदेवाचे पुत्र अक्षय कुमार यांची उत्पत्ती झाली होती. त्यामुळे या दिवसाला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. यादिवशी जे काम केले जाते ते अनंत काळासाठी अक्षय्य राहते, अशी धार्मिक मान्यता आहे. सोनं हे लक्ष्मीमातेचं भौतिक स्वरुप आहे आणि तीच या दिवसाची स्वंयंसिध्दता आहे. त्यामुळे यादिवशी सोनं खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व असून सोनं खरेदीमुळे लक्ष्मीमाता प्रसन्न होईल. 


संबंधित बातम्या :


Akshay Tritiya 2023 : यावर्षी अक्षय्य तृतीया कधी आहे? जाणून घ्या शुभपर्वाचं महत्त्व आणि मुहूर्त