Akshaya Tritiya 2023: साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी घरात इतर काही वस्तू आणू शकता. यामुळे  लक्ष्मी मातेचा आशीर्वाद  तुम्हाला मिळेल 


अक्षय्य तृतीया  वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया म्हणतात. अक्षय तृतीया हा स्वयंभू मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे. असे मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते शुभ होते. त्याचप्रमाणे यादिवशी  जप, तपस्या आणि दान केल्याने उत्तम फळ मिळते


अक्षय तृतीयेला 'आखा तीज' असेही म्हणतात. यंदा अक्षय तृतीया हा सण 22 एप्रिलला शनिवारी साजरा होणार आहे. अक्षय तृतीया 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 23 एप्रिल रोजी सकाळी 07.47 वाजता संपणार आहे. अक्षय तृतीयेचा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी वाढते असे मानले जाते.
 


तुम्ही जरी सोने खरेदी करू शकत नसाल तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही. सोन्याव्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या वस्तू घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो. 
 


अक्षय्य तृतीयेला या वस्तू घरी आणा


- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर या दिवशी कवड्या नक्की खरेदी करा, कारण महालक्ष्मी मातेला कवड्या प्रिय असतात. 11 कवड्या घेऊन त्याची पूजा करा. त्यामुळे तुमच्यावर माता महालक्ष्मीची कृपा होईल 


- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणा. हा शंख दैवी मानला जातो. दक्षिणावर्ती शंखाची पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार या शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली. याला देवी लक्ष्मीचा भाऊ देखील मानले जाते. हा शंख घरात ठेवल्याने लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं 
 
- एकाक्षी नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. मान्यतेनुसार, ज्या लोकांकडे एकाक्षी नारळ असेल त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते. या लोकांच्या आयुष्यात कधीच आर्थिक समस्या येत नाहीत. म्हणूनच अक्षय  तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरी एकाक्षी नारळ आणा.
 
- पारद शिवलिंग घरात ठेवणे खूप शुभ असते. अक्षय्य तृतीयेला पारद शिवलिंग घरी आणून त्याची विधि आणि  नियमानुसार पूजा करावी. पारद शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिवासोबतच लक्ष्मी मातेची कृपाही कायम राहते. हे घरात ठेवल्याने लक्ष्मी आणि देव कुबेर यांचा कायम वास होतो. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरामध्ये पारद शिवलिंग नक्की आणा.
 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)