Nanded Crime News : प्रतिबंधात्मक कारवाई होऊनही आरोपी पुन्हा धमक्या देत असल्याने मासेमारी करणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीने पोलीस स्टेशन समोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या (Nanded) इसलापुर पोलीस ठाण्याच्या समोर घडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हा तरुण 60 टक्के भाजला आहे. तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. विकास कायपलवाड असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 


किनवट तालुक्यातील भिशी येथे मासेमारी करण्यास गावातील काही जणांनी विरोध केल्यानंतर विकास कायपलवाड याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली होती. परंतु त्यानंतरही समोरील व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याने या तरुणाने इस्लापूर पोलिस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. ही घटना 16 एप्रिलच्या सायंकाळी घडली. या घटनेत विकास कायपलवाड 60 टक्के भाजला गेला आहे.


विकास कायपलवाड मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. भिशी येथील तलावातून तो मासे पकडतो. परंतु गावातीलच काही जणांनी त्याला मासेमारी करण्यास रोखले होते. त्यामुळे त्या व्यक्तींच्या विरोधात कारवाईची तक्रार कायपलवाड यांनी इस्लापूर पोलिस ठाण्यात दिली होती. इस्लापूर पोलिसांनी लगेच संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. परंतु त्यानंतरही कायपलवाड यांना त्रास वाढतच गेला. समोरच्या व्यक्तींकडून त्यांना धमक्या देण्याचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे हताश झालेल्या कायपलवाड याने इस्लापूर पोलिस ठाण्याच्या समोरच स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझविली. त्यानंतर कायपलवाड याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.  विकास 60 टक्के भाजला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. 


सतत सुरु होता त्रास...


भिशी येथील तलावातून पकडण्यासाठी वातीलच काही जणांनी विकासला विरोध केला होता. त्यामुळे त्याने पोलिसात धाव घेतली होती. पोलिसांनी संबधित व्यक्तींविरोधात कारवाई देखील केली. मात्र त्यानंतर देखील समोरील व्यक्तीकडून विकासला होणार त्रास सुरूच होता. तर पोलिसात तक्रार केल्याने हा त्रास अधिकच वाढला होता. त्याला सतत धमक्या मिळत होत्या. त्यामुळे विकास हताश झाला होता. पोलिसांकडून कारवाई होऊन देखील संबधित व्यक्ती त्रास देत असल्याने आता काय करावे? असा त्याला प्रश्न पडला होता. त्यामुळे हतबल झालेल्या विकासने अखेर इस्लापूर पोलिस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. 


इतर महत्वाचे बातम्या: 


 Crime News : धक्कादायक! शेतातून गेल्याचा राग आला; शाळकरी मुलाची हत्या करुन मृतदेह टांगले झाडाला