Aashadh Deep Amavasya 2022 : आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते. या वर्षीची आषाढ अमावास्या गुरुवार, 28 जुलै 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधीक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. बुधवार 27 जुलैला अमावस्या प्रारंभ होणार आहे.
आषाढ अमावस्येनंतर हिंदू धर्मीयांचा पवित्र महिना श्रावण महिन्याची सुरूवात होते. यंदा हा श्रावण मास 29 जुलैपासून शनिवार 27 ॲागस्ट 2022 पर्यंत पाळला जाणार आहे. त्यामुळे या पवित्र महिन्याच्या पूर्वसंध्येला दीप अमावस्या साजरी करण्याची जुनी परंपरा आहे.
दीप अमावस्या 2022 तारीख, तिथी वेळ :
यंदा आषाढ महिन्यात अमावस्येची सुरूवात 27 जुलै दिवशी रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे. तर अमावस्येची समाप्ती 28 जुलै दिवशी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे दीप अमावस्या 28 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे.
दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन करून संध्याकाळी श्लोक म्हटले जातात. तिमिराकडून तेजा कडे नेणारा दिवा हा हिंदू धर्मामध्ये कायमच पूजनीय राहिला आहे. या दिव्याची पूजा करून अधर्माकडून धर्माकडून, दु:खाकडून सुखाकडे प्रवास व्हावा अशी मनोकामना केली जाते.
दीप अमावस्या पूजा पद्धत :
- दीप अमावस्येला घरातील दिवे स्वच्छ करून एकत्र मांडतात.
- या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.
- दिव्यांभोवती रांगोळी घालून ते प्रज्वलित करतात.
- त्यांची पूजा करतात. पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :