Shani 2024 : नवीन वर्ष 2024 ची मूलांक संख्या 8 आहे, जी शनिदेवाची (Shani) संख्या आहे.  ग्रह संक्रमणानुसार, 2024 वर्षाचा राजा मंगळ असेल आणि मंत्री शनि असेल. म्हणजे राजा मंगळ शनीच्या बुद्धीने काम करेल, त्यामुळे देशात आणि जगात अशा अनेक घटना घडतील, ज्यामुळे लोक हैराण होतील. जगभरात अनेक ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती निर्माण होऊन सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे. देशात राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडणार आहेत. 2024 मध्ये देशात आणि जगात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊया.


2024 मध्ये रोगराईचा कहर


2024 मध्ये ग्रहांच्या संक्रमण स्थितीवरुन असं दिसून येतं की, पुढील वर्षी काही गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे जगात काही धोकादायक आजार पसरू शकतात. या भयानक आजारांमुळे लोकांना त्रास होईल आणि अराजकतेची परिस्थिती निर्माण होईल.


सत्ता परिवर्तनाची शक्यता


26 जानेवारी 2024 ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत फाल्गुन महिन्यात खापर योग तयार होत असल्यामुळे सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या नेत्यासाठी हा काळ त्रासदायक ठरू शकतो. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते.


राजकीय पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता


2024 मध्ये देशात राजकीय हिंसाचार, जातीय तेढ आणि तोडफोडीच्या अधिक घटना घडतील. भारताला राजकीय पटलावर विशेष चढउतारांचा सामना करावा लागू शकतो. या काळात, विविध राजकारणी आणि राजकीय पक्षांमध्ये संघर्ष दिसू शकतं. तसेच या काळात अनेक नव्या आघाड्या पाहायला मिळतील. देशात भ्रष्टाचार, चोरी, फसवणूक, दरोडे, हिंसक घटना वाढू शकतात.


शनिच्या स्थितीमुळे जागतिक उलथापालथ


राजा मंगळ आणि मंत्री शनि या दोन मुख्य ग्रहांच्या निकटतेमुळे जगातील अनेक विकसित देशांमध्ये संघर्ष आणि युद्धाचं वातावरण असेल. 2024 मध्ये जगातील विविध राष्ट्रप्रमुखांमधील परस्पर वैमनस्यामुळे सतत युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतासह अनेक देशांमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळेल. 


नैसर्गिक घटनांमुळे अडचणी वाढतील


ज्येष्ठ महिन्यातील गुरु, शुक्र इत्यादी ग्रहांचा अस्त भारतातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील अस्थिरता, अनिश्चितता आणि अशांतता दर्शवतो. याशिवाय पुढील वर्षी काही भागात दरड कोसळण्याच्या घटनाही दिसून येतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


New Year 2024 : नववर्षात 'या' राशीच्या लोकांना होणार धनलाभ; प्रगतीचे मार्ग होणार खुले, तिजोरी नेहमी राहील भरलेली