नागपूरः जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम नागपूर जिल्ह्यातील पेरणीवर झाला आहे. आतापर्यंत केवळ 59 टक्केच क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पेरण्यांना होत असलेल्या विलंबाचा फटका उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.


गेल्यावर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने यंदा त्याच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदा 2 लाख 9 हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड होण्याचा अंदाज असून आतापर्यंत 1 लाख 71 हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. मागील काही वर्षातील कापसावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावानंतर जिल्ह्यातील कापसाचे क्षेत्र सात ते आठ हजार हेक्टरने घटले आहे. परंतु कापसाला चांगला भाव मिळाल्याने जिल्ह्यात पुन्हा कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला. जवळपास 80 टक्के हेक्टरमध्ये पेरणी झाली.


कापसाच्या खालोखाल सोयाबीनचे क्षेत्र आहे. सोयाबीन 1 लाख 10 हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज असून आतापर्यंत 66 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. तर तूर 53 हजार हेक्टरपैकी 40 हजार हेक्टरमध्येच पेरणी झाली. इतर पिकांच्या पेरणीचा टक्काही कमी आहे. पावसाला झालेल्या विलंबाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीप हंगामातील पेरणीला विलंब झाल्याने रब्बीमधील पेरणीस विलंब होणार असल्याचे सांगण्यात येते.


सोयाबिनची दुबार पेरणी?


कुही, भिवापूर तालुक्यात सोयाबिनचे पीक उगवलेच नाही. सोयाबिनचे बियाणे योग्य नसल्याने ते उगवले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Elections 2022 : 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर


kirit somaiya : शिंदे गटातील पहिला आमदार आक्रमक, आमची उद्धवसाहेबांवर श्रद्धा, सोमय्यांना रोखा, अन्यथा सत्तेला लाथ मारु!


Electricity Rate Increase : महाराष्ट्राच्या जनतेला शॉक! वीज दरामध्ये मोठी वाढ


Assassinations That Shook The World : अब्राहम लिंकन, महात्मा गांधी ते शिंजो आबेंपर्यंत, जगाला हादरवून टाकणाऱ्या 10 धुरंदर नेत्यांच्या हत्या!