Wardha Latest Agriculture News : वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील भिडे येथील एका शेतकऱ्याला घोणस अळीचा स्पर्श झाल्यामुळे त्याला तीव्र वेदना होऊन रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यामुळे वर्धा जिल्हातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून दहशत निर्माण झाली आहे..


देवळी तालुक्यातील भिडी येथील शेतकरी राजू होले यांची भांडापूर शेत शिवारात शेती आहे. आज 16 सप्टेंबर रोजी ते शेतात गवत कापायला गेले होते. गवत काढत असताना अचानक त्यांना घोणस या अळीचा स्पर्श झाला. डाव्या हाताला घोणस आळीचा स्पर्श होताच त्यांच्या संपूर्ण शरीरात वेदना व्हायला लागल्या. त्यानंतर त्यांनी ताबडतोब भिडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतला. त्यानंतर त्यांची प्रकृती आता व्यवस्थित झाली आहे. परंतु घोणस अळी ही शेतकऱ्यांसाठी अतिशय त्रासदायक अळी असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. दिनांक 15 सप्टेंबर रोजी तळणी खंडेराव येथील एका शेतकऱ्याशी असाच प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली. त्या शेतकऱ्याला सावंगी मेघे रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. घोणस अळीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


अतिवृष्टीनंतर घोणस अळीमुळे शेतकरी चिंतेत : 
वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या संकटातून सावरत नाही तर घोणस अळीमुळे गंभीर समस्ये उद्भवली आहे. सध्या शेतीचे दिवस आहेत व या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शेतकऱ्यांनी या अळी पासून काळजी घेण्याचे आवाहन पुलगाव येथील मंडळ कृषी अधिकारी अतुल जावळे यांनी केले आहे.


कुठे आढळते घोणस अळी ?:
घोणस अळी प्रामुख्याने उसाच्या फडात असणाऱ्या गवतावर जास्त प्रमाणात आढळून येते. तिचे वैज्ञानिक नाव स्लग कॅटरपिल्लर असे आहे. पण शेतकरी त्याला घोणस अळी म्हणतात ग्रामीण भागात पानविंचू सुद्धा शेतकरी या अळीला संबोधतात.. 


कशी असते घोणस अळी?
ही अळी विषारी असून ब्लेड सारखी काटेरी असते. तिचा रंग पिवळा अथवा हिरवा असतो. सध्या मोठ्या प्रमाणात घोणस अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. घोणस अळीने चावा घेतला तर वेदना फार असह्य होतात. तिच्या चाव्याने व स्पर्शाने अंग बधीर होते. शेतकऱ्यांनी लवकरच उपचार घेतला तर घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.


आणखी वाचा :
Nashik : विद्यार्थी शेतात लावतात भेंडी, मिरची आणि टोमॅटो... नाशिकमधील शाळेत दिले जातात शेतीचे धडे
Agriculture : आधीच लम्पी त्यात सीएमव्ही, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, केळीच्या बागाच काढाव्या लागतायेत