मुंबई : आंबा हा फळांचा राजा मानला जातो. त्यातच कोकणी हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. हापूस आंब्याला अव्वल दर्जा मिळतो आणि त्यांची मागणीही जगभरात असते. मात्र, हापूस आंब्या व्यतिरिक्तही आंब्यांच्या अनेक प्रजाती आहे. बाजारात हापूस आंब्याप्रमाणेच इतरही विविध प्रकारचे आंबे उपलब्ध असतात. भारतात आंब्याच्या 1500 हून अधिक प्रजाती आहे. यातील प्रत्येक आंब्याची खासियत काही वेगळी आहे.
Types of Mangoes : भारतातील टॉप 10 आंबे कोणते आणि त्यांची खासियत काय?
हापूस आंबा (Hapus Mango)
हापूस आंबा म्हणजे अस्सल आंबा असं म्हटलं जाते. कोकणी हापूस आंब्याला मोठी मागणी असते. याची चव, रंग, सुगंध यामुळे याची मागणी वाढते परिणामी याची किंमत जास्त असते. बाजारातस मुख्यत: रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस यांना मोठी मागणी असते, कारण हेच अस्सल हापूस आंबे असतात. याशिवाय या आंब्यांची लागवड कर्नाटक, बंगळुरूतही केली जाते. मात्र, या आंब्यांना कर्नाटकी हापूस म्हणतात. हे आंबे अस्सल कोकणी हापूस आंबे नसतात.
केसर आंबा (Kesar Mango)
केसर आंब्याला केसरी असंही म्हणतात. केसरप्रमाणे भगव्या रंगामुळे याचं नाव केसर आंबा असं पडलं आहे. हा आंबा अतिशय गोड असल्याने याला "आंब्याची राणी" म्हटलं जातं. केसर आंबा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय आंबा आहे. या आंब्याचा आकार अंडाकृती आणि मध्यम असतो. केसरी आंबा त्याच्या पातळ सोनेरी पिवळ्या रंगाने लालसरपणाने ओळखता येतो. आतून रसाळ आणि गुळगुळीत लालसर केसरी साल अशी याची ओळख आहे. अहमदाबादपासून 320 किमी अंतरावर असलेल्या गुजरातमधील जुनागढच्या गिरनार टेकड्यांमध्ये या आंब्याची लागवड केली जाते.
तोतापुरी आंबा (Totapuri Mango)
तोतापुरी आंब्याला बंगनापल्ली, बंगलोर आंबे असंही म्हणतात. या आंब्याला तोतापुरी हे नाव त्याच्या आकारामुळे पडलं आहे. याचा आकार पोपटाच्या चोचीसारखा आणि रंग हिरवा असतो. तोतापुरी आंब्यांना आंबड-गोड अशी एक अनोखी चव असते. हे आंबे जास्त गोड नसतात. हा आंबा लाल आकाराचा असतो.तोतापुरी आंबा भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, बंगळुरू आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पिकवला जातो. बंगळुरू हे तोतापुरीचे प्राथमिक स्त्रोत आहे. कच्च्या तोतापुरी आंब्याचा वापर चटणी आणि लोणची बनवण्यासाठी केला जातो. हे आंबे व्यावसायिक प्रक्रियेसाठी लोकप्रिय आहेत.
लंगडा आंबा (Langra Mango)
लंगडा आंब्याची प्रजाती उत्तर प्रदेशातील बनारस येथील आहे. हा आंबा अतिशय रसाळ आणि गोड असतो. लंगडा आंबा चोखून खाता येत नाही. या आंब्याची साल अतिशय पातळ असते, त्यामुळे आंब्याची सालही केळीप्रमाणे सहज सोलून निघते आणि हा आंबा खाण्याची मजा काही वेगळीच असते.
दशेरी आंबा (Dasheri Mango)
हा आंबा महाराष्ट्रात दशेरी या नावाने प्रसिद्ध आहे. मात्र उत्तर भारतात हा आंबा दशहरी या नावाने ओळखला जातो. ही उत्तर भारतातील अतिशय प्रसिद्ध अशी प्रजाती आहे. हा आंबा लांबट आकाराचा असतो. साधारणपणे एक वर्षाआड याला फळे येतात. या आंब्याची चव इतर जातीच्या आब्यापेक्षा खूपच जास्त गोड असते. यामुळे हा जास्त प्रमाणात खाता येत नाही.
चौसा आंबा (Chausa Mango)
चौसा आंबा ही प्रजाती बिहार आणि उत्तर प्रदेशातील आहे. चौसा आंबा भारत आणि पाकिस्तानातही पिकवला जातो. चौसा आंबा दक्षिण आशियात खूप लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या भारतातील उत्तरेकडील राज्यांमधील हा आंब्याचा एक लोकप्रिय प्रकार आहे. हा आंबा मूत्रपिंडाच्या आकाराचा असतो. चौसा आंबा काहीसा आंबट आणि गोड असतो. चौसा आंबा चोखून खाता येत नाही तो, कापूनच खावा लागतो.
नीलम आंबा (Neelum Mango)
नीलम आंबा हा आंब्याचा आणखी एक प्रसिद्ध प्रकार आहे. नीलम आंबा विशेषतः आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पिकवला जातो. नीलम आंब्याची सर्वात चवदार प्रजाती आंध्र प्रदेशातून येते. नीलम हे नाव पाकिस्तानच्या नीलम नदीवरून आले आहे जेथे ते भरपूर प्रमाणात हे आंब्यांची लागवड केली जाते. इतर आंब्यांच्या तुलनेत, नीलम आंबे विशिष्ट गोड आणि सुगंधी असतात आणि आकाराने लहान असतात, हे आंबे नारिंगी रंगाचे असतात.
किसन भोग आंबा (Kishan Bhog)
किशन भोग हा बिहार आणि पश्चिम बंगालमधील आंब्याच्या सर्वात प्रसिद्ध प्रजातींपैकी एक आहे. किसन भोग आंबा त्याची मधासारखी चवीसाठी ओळखला जातो. या आंब्याच्या या जातीची लागवड मुख्यत्वे पश्चिम बंगालमध्ये केली जाते. किसन भोग आंबा मोठ्या आकाराचा असून नाजूक सालीमुळे प्रसिद्ध आहे. या आंब्यामध्ये फायबर नसते. पश्चिम बंगालमधील मालदा, हुगळी, नादिया आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यात आंब्याची लागवड केली जाते. आकाराने मोठ्या असलेल्या या आंब्याचे वजन सुमारे 300-400 ग्रॅम असते.
बॉम्बे ग्रीन आंबा (Bombay Green Mango)
बॉम्बे ग्रीन आंबा बाजारात 'कैरी' म्हणून ओळखला जातो. हा आंबा लोणची आणि इतर पाककृती करण्यासाठी वापरला जातो. हा आंबा पिकलेला आणि हिरवा नसताना कापणी केलेल्या आंब्याची एक प्रजाती आहे. हा आंबा इतर आंब्याच्या तुलनेत आकाराने लहान आणि गोलसर, फुगीर असतो. याचं उत्पादन आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घेतलं जातं. त्याची कापणी एप्रिल ते जून या कालावधीत केली जाते आणि याला एक विशिष्ट आंबट, तुरट चव असते. कडक आंब्यामध्ये मोठा गर असतो, ज्यामुळे याचा वापर लोणची बनवण्यासाठी केला जातो. हे आंबे हलके हिरव्या रंगाचे असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :