Success Story : उत्तर प्रदेशात  (UP) फळबागांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असाच एक शेतकरी आनंद मिश्रा आहे. ज्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून लिंबाच्या बागेतून भरघोस कमाई केली आहे. लिंबाच्या बागेतून शेतकऱ्याने राज्यातील इतर शेतकऱ्यांसमोर असा आदर्श ठेवला आहे, जो पाहून इतर शेतकरीही लिबांच्या बागेकडे वळू लागलेत. आनंद मिश्रा यांना संपूर्ण जिल्ह्यात लेमन मॅन म्हटले जाते. लिंबाच्या शेतीतून ते दरवर्षी 9 लाख रुपये मिळवत आहेत. पाहुयात या लेमन मॅनची यशोगाथा.


लिंबाची बाग ही फायदेशीर ठरत आहे. या बागेमध्ये शेतकऱ्याला एकदाच झाडे लावावी लागतात. त्यानंतर जवळपास 25 वर्षे ही लिंबाची बाग फायदेशीर ठरते. लिंबू बागेत इतर खर्चही कमी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो.


बहुराष्ट्रीय नोकरी सोडून शेतकऱ्याने केली शेती


रायबरेली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून कचनावा गाव 20 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात लोक आनंद मिश्रा यांना लेमन मॅन म्हणतात. गावात प्रवेश करताच लिंबाचा वास येऊ लागतो. आनंद मिश्रा यांनी शेतकऱ्याशी संवाद साधताना सांगितले की, तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होता. बीबीए केल्यानंतर त्यांनी 2002 पासून फर्निचर कंपनीत काम करायला सुरुवात केली. त्यांचे वार्षिक पगाराचे पॅकेज 6 लाख रुपये होते, पण शेतकर्‍यांनाही फायदा होईल असे काहीतरी करायचे त्यांच्या मनात होते. त्यामुळं 2016 मध्ये त्यांनी नोकरी सोडून लिबांच्या बागेची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी गहू आणि धानाचे पिक त्यांनी घेतले होते. पण यश मिळाले नाही. त्यानंतर 1 वर्ष ते विविध प्रकारच्या बागायती शेतीची माहिती गोळा करत होते. यावेळी लिंबाची मागणी वर्षभर राहते, त्यामुळं त्यांनी लिंबू बागायत शेती करण्याचा निर्णय घेतला. 


लिंबाची शेती करताना काय काळजी घ्यावी?


आनंद मिश्रा यांच्या दोन एकर शेतात 400 हून अधिक लिंबाची रोपे लावली आहेत. त्यांच्या बागेमध्ये लिंबाच्या एकूण सात जाती आहेत, ज्यामध्ये बियाविरहित थाई लिंबू, NRCC-8, प्रमालिनी आणि काग्झी रास्पबेरी जातींचा समावेश आहे. लिंबाची लागवड करताना एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंत 10×20 फूट अंतर ठेवावे. लिंबासाठी पाणी साचणारी जागा नसावी. थाई जातीच्या लिंबाची लागवड केल्यावर दुसऱ्या वर्षापासून शेतकरी पिक घेण्यास सुरुवात करतो. एक वनस्पती 4 ते 5 वर्षांत वर्षातून दोनदा फळ देते. एका झाडापासून 3,000 ते 4,000 रुपये मिळू शकतात. दोन एकर बागकामातून त्यांना दरवर्षी 9 लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते.


एकदा लागवड 25 वर्ष उत्पन्न


लिंबाची एकदा लागवड केली की 25 वर्षे त्यापासूम नफा मिळतो. लिंबाच्या बागेत जास्त कीटकनाशके वापरण्याची गरज नाही. कारण लिंबावर रोगांचा धोका कमी असतो. त्याचबरोबर सिंचनासाठी ठिबक सिंचन अधिक फायदेशीर ठरते. लिंबाची रोपे शेतात पूर्वेकडून पश्चिमेकडे लावावीत, त्यामुळे त्यांना हवा आणि पुरेसा प्रकाश मिळेल, त्यामुळे झाडांची वाढ लवकर होईल.


लिंबाचा वापर वर्षभर सुरूच असतो. लिंबू वनस्पती वर्षातून दोनदा फळ देते. आनंद मिश्रा यांच्या बागेत थाई प्रकारची अधिक झाडे आहेत. या प्रकारच्या फळांमध्ये बिया नसतात आणि भरपूर रस असतो. हिवाळ्यात त्याचा आकार मोठा असतो तर उन्हाळ्यात त्याचा आकार लहान होतो. लिंबासाठी बाजार शोधावा लागत नाही. व्यापारी त्यांच्या शेतातून लिंबू खरेदी करतात. शेतातूनच 40 रुपये किलो दराने लिंबू विकला जातो. दोन एकरांवर लिंबू लागवड करण्यासाठी एक लाख रुपये खर्च करून शेतकरी दरवर्षी 9 लाख रुपये मिळवत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


जगातील सर्वात महाग बटाटे कुठे? सोने-चांदीपेक्षाही महाग असणाऱ्या बटाट्याची किंमत एकूण व्हाल थक्क