Saffron : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या केशराचा (saffron) तुटवडा जाणवत आहे. इराणमध्ये (Iran) यंदा केशराचे कमी उत्पादन हे त्याचे प्रमुख कारण आहे. एका अहवालानुसार, इराण, केशरचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. इराणमधून मौल्यवान मसाल्याचा पुरवठा देखील होतो. त्याचा सुगंध, चव आणि रंगासाठी ओळखला जातो. 2022 च्या तुलनेत यावर्षी इराणमध्ये केशरचे उत्पादन कमी झाल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे. जगभरात 90 टक्के केशरचा पुरवठा हा इराणमधून केला जातो. त्यामुळं उत्पादन कमी झाल्यास केशरच्या किंमती वाढू शकतात.
जगाच्या 90 टक्के भागाला फक्त इराणमधून केशराचा पुरवठा होतो. एका अहवालानुसार इराणमध्ये केशराचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटले आहे. अशा स्थितीत देशांतर्गत बाजारात याच्या किमती प्रचंड वाढू लागल्या आहेत. भारतातील तणावही वाढू लागला आहे.
बदलत्या हवामानाचा पिकाला फटका
बदलत्या हवामानाचा फटका केशर शेतकऱ्यांना मोठा बसला आहे. मागील वर्षामध्ये हिवाळ्यात खूप कमी तापमान होते. परंतू, यावर्षी असामान्य उष्णतेमुळं पिकावर नकारात्मक परिणाम झाला आहे. सिंचनासाठी बांधलेल्या हजारो विहिरी कोरड्या पडल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. तज्ज्ञांनी हवामान बदलाची चिन्हे आणि ते पिकांसाठी किती नकारात्मक असू शकतात याचा इशाराही दिला आहे. इराणचे हवामानशास्त्रज्ञ मोहम्मद दरविश म्हणाले की, इराण इतर देशांपेक्षा अधिक असुरक्षित असू शकतो, विशेषत: शुष्क आणि अर्ध-रखरखीत प्रदेशात, जेथे केशर पिके वाढते आणि जेथे पाऊस कमी होत आहे आणि तापमान वाढत आहे.
भारतावरही परिणाम
गेल्या वर्षीच्या तुलनेत केशरचे दर दुपटीने वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. इराणच्या देशांतर्गत बाजारात केशर 1400 डॉलर प्रति किलो आणि परदेशात 1800 डॉलर प्रति किलो दराने विकले जात आहे. चढ्या भावामुळं अनेक चिनी व्यापारी परत गेल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी देशात पीक कमी झाल्याने गोदाम रिकामे आहेत, त्यामुळे पुन्हा ते आल्यावर त्यांना जास्त भावाला सामोरे जावे लागू शकते.
भारतात इराणवरुन मसाल्यांची आयात
भारत इराणकडूनही मोठ्या प्रमाणात केशर खरेदी करतो. देशांतर्गत बाजारातील किमती वाढल्याने भारतात येणाऱ्या केशरच्या किंमतींवरही परिणाम होणार आहे. याचाच अर्थ असा की, येत्या काळात देशात मसाल्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. जगाच्या 90 टक्के भागाला फक्त इराणमधून केशराचा पुरवठा होतो. एका अहवालानुसार इराणमध्ये केशराचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: