Maharashtra weather: गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान घसरण झाल्याचे चित्र असताना येत्या 48 तासात राज्यात तापमानात पुन्हा चढ उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार हिमाचल प्रदेश राजस्थान पंजाब या भागात दोन दिवस कडाक्याच्या थंडीसह प्रचंड गारठा जाणवणार आहे. (Cold temperature)तर दक्षिणेत तमिळनाडू, केरळ भागात पावसाला पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झालं आहे. परिणामी राज्यातील थंडीसाठी तयार झालेले पोषक वातावरण बदलणार असून महाराष्ट्रात येत्या 48 तासात किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.(IMD forecast)

Continues below advertisement

प्रादेशिक हवामान केंद्रांना दिलेल्या अंदाजानुसार, कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या चार ते पाच दिवसात कमाल तापमानातही 2 ते 3 अंशाने वाढ होणार आहे. येत्या दोन दिवसात किमान तापमान फारसे बदलणार नाही. त्यानंतर त्यात बदल होतील. विदर्भात येत्या तीन दिवसात कमाल व किमान तापमान त्यानंतर दोन ते तीन अंशांची घट होणार आहे. (IMD weather alert)

राज्यात तापमानाचा पारा कुठे कसा? 

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान काही अंशांनी घट पाहायला मिळत आहे. राज्यात कोरड्या व शुष्क वाऱ्यांचा प्रभाव सक्रिय असल्याने पहाटे प्रचंड गारठा आणि थंडीचा जोर वाढलाय. तर दुपारी उन्हाचा चटका बसतोय. प्रजासत्ताक दिनादिवशी (26) राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला होता. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून 17 ते 18 अंश असणारे तापमान 15 ते 16 अंशापर्यंत आले होते. बहुतांश मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानाचा पारा 13 ते 20 अंशापर्यंत स्थिरावल्याची नोंद झाली.(Minimum temperature) तर कमाल तापमानात चांगलीच वाढ पाहायला मिळाली. बहुतांश राज्यात तापमानाचा पारा 29 अंशापासून 38 अंशापर्यंत होता. कोकणात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस होते तर ठाणे पालघर जिल्ह्यात 26 अंश सेल्सिअस पर्यंत पारा गेला होता. दरम्यान, सुर्याचे उत्तरायण सुरु असून दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाणार आहे.

Continues below advertisement

आकाश निरभ्र, गारठा कमी होणार 

मराठवाडा सह उत्तर महाराष्ट्र मध्य व पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा 33 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहणार असून येत्या दोन दिवसात किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. दोन दिवस राज्यातील कमाल व किमान तापमानात फारसा बदल नसला तरी या आठवड्यात तापमानात चढ-उतार जाणवणार आहे.

हेही वाचा:

Kulhad Pizza Viral Couple : MMS लिक झालेल्या व्हायरल कुल्हड पिझ्झा कपलच्या अडचणी संपेनात, विदेशात गेल्यावर समोर उभं ठाकलं मोठं संकट