SMAM Kisan Yojana : भारतातील मोठ्या संख्येने लोक शेती व्यवसायाशी निगडीत आहेत. भारताच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 17 ते 18 टक्के आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासन शेतकऱ्यांना अनेक सुविधा देत असते. देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे विविध योजना राबवतात. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना कमी किमतीत खत, खते इत्यादी आर्थिक आणि शेती संबंधित उपकरणे, वस्तूही पुरवल्या जातात. याशिवाय सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना इत्यादी योजना देखील चालवते.
शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर सुमारे 50 ते 80 टक्के सवलत मिळू शकते. तुम्हालाही या सवलतीचा फायदा घेता येऊ शकतो. जाणून घ्या 'स्माम' योजनेबाबत...
स्माम योजनेचा लाभ कोणासाठी ?
देशभरात शेती करणारा कोणत्याही शेतकऱ्याला या स्माम योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेतंर्गत महिला शेतकरीदेखील फायदा घेऊ शकतात. या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांवर बाजारातील दरावर 50 ते 80 टक्के अनुदान देते. शेती उत्पादन वाढवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देते. त्याअनुषंगाने हे अनुदान देण्यात येते.
स्माम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- वास्तव्याचे प्रमाणपत्र
- सातबारा उतारा
- बँक पासबुक
- मोबाइल क्रमांक
- जातीचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
स्माम किसान योजनेसाठी अर्ज कसा कराल?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करा
- या ठिकाणी Registration हा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुम्हाला शेतकरी (फार्मर) हा पर्याय निवडावा लागणार
- या पर्यायावर क्लिक केल्यास एक पेज सुरू होईल
- त्यावर तुम्हाला नोंदणी करावी लागेल
- त्यानंतर नाव, आधार क्रमांक नमूद करा
- त्यानंतर तुम्हाला अर्जात संपूर्ण माहिती भरावी लागणार
- शेवटी, सबमिट या पर्यायावर क्लिक करा. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.