Vegetarian Village In Maharashtra : बदलत्या काळात अनेक जण मांसाहार आणि व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत असतानाच, या सर्वांपासून दूर राहून संपूर्ण शाकाहारी गाव अशी ओळख जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील कनाशीने निर्माण केली आहे, गेल्या आठशे वर्ष पासून या गावानं शाकाहारी राहण्याची अखंड परंपरा जपली आहे. जळगाव जिल्ह्यातील कनाशी हे तीन हजार लोकवस्तीचं असून ते महानुभव पंथाचं छोटंसं गाव आहे. महानुभव पंथाची उपासनापद्धती आण‌ि श‌िकवण यामुळे शेकडो वर्षापासून या गावात मांसाहारावर बंदी आहे. भ‌िन्न व‌िचार अन् भ‌िन्न रुचीची माणसे एका गावात नांदतानाही शाकाहारावर मात्र त्यांचे एकमत असल्याचे पाहायला मिळत आहे.


महाराष्ट्रातील शाकाहारी आणि निर्व्यसनी असलेले 'कनाशी' गाव


जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची अखंड परंपरा या गावाला आहे. तसं पाहिल्यास या देशात कनाशी नावाची पाच ते सहा गावं असतील; परंतु या कनाशीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. इथे येणारा सहसा रिकाम्या हाताने जात नाही, असं म्हटलं जातं. येणारा प्रत्येक व्यक्ती आपण शाकाहारी आणि निर्व्यसनी असल्याचं अभिमानाने आणि आनंदाने सांगत असतो, या ठिकाणच्या गावकऱ्यांचे आदरातिथ्याचं कौतुक करावे तेवढे थोडे आहे. बाराव्या शतकातील तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची एक आख्याय‌िका आजही सांगितली जाते.


आनंदाने शाकाहार जीवन पद्धती स्वीकारली
महानुभाव पंथाची प्रमुख एक जीवन पद्धती आहे त्यामध्ये अनुयायी हे शाकाहारी आणि निर्व्यसनी असावे या शिकवणीनुसार आठशे वर्षांपासून या कानाशी गावात सर्व जाती धर्माच्या लोकांनी महानुभाव पंथ स्वीकारला आहे, ज्यांनी तो स्वीकारला नसला तरी त्यांनी मांसाहार आणि व्यसनाधीनता पासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. शाकाहार हा मानवीय आहार असल्याने आणि या मध्ये अहिंसा असल्याने या परिसरातील नागरिकांनी मोठ्या आनंदाने शाकाहार जीवन पद्धती स्वीकारली असल्याचं पाहायला मिळते