Rabi crops : देशातील काही राज्यांमध्ये चांगला पाऊस (Rain) झाला आहे, तर काही राज्यात मात्र, कमी पाऊस झाला आहे. पावसाची ही अनियमित लक्षात घेता रब्बी हंगामातील पिके, विशेषतः डाळी (Pulses) आणि तेलबिया (oilseed) यांची पेरणी लवकर होण्याची गरज निर्माण झाली आहे. वर्ष 2022-23 मधील रब्बी हंगामासाठी सरकारनं डाळी तसेच तेलबिया यांच्या मिनीकिट्सचा पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. तसेच या प्रक्रियेत नियमित पुरवठ्यासोबतच राज्यांमधील कमी पावसाच्या प्रदेशांवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे.  8.3 लाख मिनीकिट्सच्या वितरणाच्या माध्यमातून तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.


बियाणे म्हणजे एक संपूर्ण तंत्रज्ञान आहे. बियाणांमध्ये पिकांची उत्पादकता 20 ते 25 टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता असते. शेतीसाठी उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळं उत्पादन आणि उत्पादकता दोन्हींमध्ये वाढ दिसून येते. त्यामुळं शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यासोबत, एकंदरच कृषी व्यवस्थेला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. त्यामुळं सरकारनं या रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच नाफेड इत्यादी केंद्रीय संस्थांकडून मिनीकिट्सचे वितरण केले जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे संपूर्ण अनुदान मिळालेल्या केंद्रीय संस्था देखील या कामी मदत करत आहेत.


विदर्भातही रॅपसीड आणि मोहरीच्या लागवडीसाठी प्रयत्न 



  • उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या हेतूने, शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या अत्याधुनिक वाणांची लोकप्रियता वाढवणे.

  • वर्ष 2022 च्या खरीप हंगामात, ज्या राज्यांमध्ये कमी किंवा अगदी तुरळक प्रमाणात पाऊस झाला अशा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड तसेच मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या काही भागात बियाणांच्या मिनीकिट्सचे वाटप करणे.

  • महाराष्ट्राच्या विदर्भ भागात आर आणि एम म्हणजेच रॅपसीड आणि मोहरी यांच्या अपारंपरिक क्षेत्रावरील लागवडीसाठी प्रयत्न करणे.


देशातील विविध राज्याच बियाणांचे वाटप


तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक यांसारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुख्य रब्बी तेलबियांचे पिक म्हणून शेंगदाण्याचे बियाणे वितरीत करणे. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थान या राज्यांमध्ये दुय्यम तेलबिया म्हणून जवसाचे बियाणे तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांमध्ये दुय्यम पिक म्हणून करडईचे बियाणे वितरीत करणे.
डाळींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं मसूर आणि उडीद यांच्या बियाणांची 4.54 लाख मिनीकिट्स उपलब्ध करून दिली असून वर्ष 2022-23 मध्ये उत्तरप्रदेश, झारखंड आणि बिहार यांसारख्या कमी पावसाच्या राज्यांमध्ये रब्बी हंगामाची पेरणी वेळेआधी सुरु करण्याच्या उद्देश आहे. देशातील 11 राज्यांमध्ये त्यातील मसुरच्या बियाणांची 4.04 लाख मिनीकिट्स वितरीत केली आहेत. एकूण तरतुदीच्या 33.8 टक्के वितरण झाले असून हे प्रमाण गेल्या वर्षी या तीन कमी पावसाच्या राज्यांमध्ये केलेल्या बियाणांच्या वितरणापेक्षा 39.4 टक्क्यांनी जास्त आहे.


कोणत्या बियाणांचे किती वाटप


सुमारे 39 कोटी 22 लाख रुपये किंमतीच्या बियाणांच्या सुमारे 8.3 लाख मिनीकिट्सच्या वितरणाच्या माध्यमातून तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामध्ये मोहरीच्या बियाणांची 10.93 कोटी रुपयांची 5 लाख 75 हजार  मिनीकिट्स, शेंगदाण्याच्या बियाणांची 16.07 कोटी रुपयांची 70 हजार 500 मिनीकिट्स, सोयाबीनच्या बियाणांची 11.00 कोटी रुपयांची 1 लाख 25 हजार  मिनीकिट्स,करडईच्या बियाणांची 65 लाख रुपयांची 32 हजार 500 मिनीकिट्स आणि जवसाच्या बियाणांची 65 लाख रुपयांची 32 हजार 500 मिनीकिट्स समाविष्ट आहेत. ही मिनीकिट्स थेट शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: