मुंबई : भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर फाळणीमुळे या दोन देशांदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर 1965 साली या दोन देशांमध्ये युद्ध झालं. भारत आणि पाकिस्तानमध्ये हे युद्ध पायदळ, नौदल आणि हवाईदल या तिन्ही प्रकारात झालं. भारताने या युद्धात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपानंतर या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध विराम घोषित करण्यात आलं. 23 सप्टेंबर 1965 रोजी या दोन देशांमध्ये युद्ध संपल्याचं जाहीर करण्यात आलं. जाणून घेऊया आजचा दिवस इतिहासातील कोणत्या घटनांचा साक्षीदार आहे, 


1908- राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म 


राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 23 सप्टेंबर 1908 रोजी झाला होता. रामधारी सिंह दिनकर हे राष्ट्रवादी कविता आणि साहित्य लेखनासाठी प्रसिद्ध होते. रामधारी दिनकर सिंह यांनी हिंदी साहित्यावर आपल्या लिखानातून मोठा प्रभाव पाडला. 


1929- भारतात पहिल्यांदा बालविवाहाला बंदी, शारदा विधेयक मंजूर


आजच्याच दिवशी, 23 सप्टेंबर 1929 रोजी भारतात बालविवाह विधेयक मंजूर करण्यात आलं. हरविलास शारदा यांनी हे विधेयक मांडलं गेलं होतं. त्यामुळे त्यांचेच नाव या विधेयकाला देण्यात आलं होतं. लग्नासाठी मुलींच्या विवाहाचे वय 18 आणि मुलांचे वय हे 21 असावं अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली होती. हा कायदा केवळ हिंदूंच्या साठीच नव्हे तर ब्रिटिश भारतातील सर्व लोकांना लागू करण्यात आला होता. भारतात सुरू असलेल्या समाजसुधारणेचे हे मोठं यश मानलं गेलं. 


1939- सिग्मंड फ्राईड (Sigmund Freud) यांचं निधन 


जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड यांचा आजच्या दिवशी म्हणजे 23 सप्टेंबर 1939 रोजी निधन झालं होतं. सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्रातील अनेक महत्त्वाचे आणि पायाभूत सिद्धांत मांडले. 20 व्या शतकातील सर्वात मोठे मानसशास्त्रज्ञ समजले जायचे. 


1965- भारत पाकिस्तानमधील युद्ध संपलं 


भारत आणि पाकिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्राने युद्धविराम घोषित केल्यानंतर 23 सप्टेंबर रोजी युद्ध समाप्त झाल्याचं जाहीर करण्यात आलं. 


2009- ओशनसॅट 2 चे प्रक्षेपण


भारताचे कृत्रीम उपग्रह ओशनसॅट 2 चे 23 सप्टेंबर 2009 साली प्रक्षेपण करण्यात आलं होतं. इस्त्रोने देशातील हवामानाचा अंदाज, हिंदी महासागरातील घडामोडी तसेच वातावरणातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली होती. यावेळी ओशनसॅट 2 सोबत एकाच वेळी सात उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं होतं. 


2020- जम्मू काश्मीरच्या अधिकृत भाषा विधेयक पारित 


भारतीय संसदेने 23 सप्टेंबर 2020 रोजी जम्मू काश्मीरच्या अधिकृत भाषेचे विधेयक पारित केलं. या विधेयकामध्ये पाच भाा