Poultry Farming Success Story: महाराष्ट्रात शेतीला जोडधंदा म्हणून अनेकजण दुधव्यवसाय तर काही जण पोल्ट्री व्यवसाय करतात. पावसाच्या बेभरवशी तालावर शेती करत राज्यातील शेतकऱ्यांनी नफा कमवण्याचे कितीतरी मार्ग शोधून काढलेले दिसतात. काही जण तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करतात. पण खान्देशातील एका शेतकऱ्यांनं पोल्ट्री व्यवसायातून लाखोंची कमाई केली आहे. मुक्त कुक्कुटपालनात शक्कल लढवली. आता १०० पिलांच्या एका बॅचमागे 25-30 हजार रुपयांचा नफा कमवत या शेतकऱ्यानं लाखोंची उलाढाल केली आहे.


जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील भूषण शांताराम महाले यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाया सुरु करण्याचं ठरवलं. या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेत चार वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये त्यांनी २४० फूट लांब व तीस फूट रुंदीचे दोन शेड बांधत कुक्कुटपालनाला सुरुवात केली. 


करार पद्धतीत गेला बराच वेळ वाया


सुरुवातीला करार पद्धतीने इतर कंपन्यांशी करार करत या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. पण म्हणावं तसं व्यवसाय चालला नाही. एक बॅच गेली तर दुसऱ्या बॅच येण्यासाठी मोठा कालावधी लागायचा. यात बराच वेळ वाया जात असल्याने या शेतकऱ्यानं एक शक्कल लढवली.


सुरु केला मुक्त पद्धतीने व्यवसाय 


करार पद्धतीच्या पोल्ट्री व्यवसायात म्हणावे तसे यश मिळत नसल्याने भूषण महालेंनी स्वतःच पिले पाळत व्यवसाय सुरू करण्याचा ठरवलं. याकरता खाजगी अंडी उबवणूक केंद्र अशी त्यांनी संपर्क केला. तसेच स्थानिक मांस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांशी, हॉटेल चालकांशी संपर्क करून विक्रीचे नियोजन परफेक्ट केलं. आणि दोन वर्षांनी म्हणजेच 2022 मध्ये मुक्त कुक्कुटपालनाला सुरुवात केली. 


50 दिवसात हजार पक्ष्यांची जागेवर विक्री


मुक्त पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीला हजार पक्षांची एक बॅच त्यांनी घेतली. म्हणजे हजार पक्षांना सलग 50 दिवस सांभाळत त्यांचा संगोपन केलं जातं. त्यानंतर पुढचे सात दिवस ब्रूडिंग मध्ये ठेवत त्यांच्या वाढीला योग्य जागा उपलब्ध करून दिली जाते. कोंबड्यांच्या आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्यांना वेळोवेळी लसीकरण करणे यामुळे 50 दिवसात हजार पक्षांची हातोहात विक्री ते करतात. 


एका बॅच मधून 25 ते 30 हजारांचा नफा 


1000 पक्ष्यांची एक बॅच. एका बॅच मधून साधारण 25 ते 30 हजारांचा नफा भूषण महाले मिळवतात. मुक्त पद्धतीच्या व्यवसायात खाद्य खरेदी पासून पक्षी विक्री पर्यंत होणाऱ्या सर्व खर्चावर नियंत्रण मिळवत त्यांनी लाखोंचा नफा मिळवला आहे.