एक्स्प्लोर

PM Kisan Yojana : खूशखबर! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा

PM Kisan Nidhi Yojana : पंतप्रधान मोदींनी पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जारी केला असून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Nidhi Yojana) 17 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी केला असून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 17 वा हप्ता जारी केला आहे. यामुळे सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. 

शेतकऱ्यांसाठी खूशखबर

आज पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 17 वा हफ्ता जारी केला आहे. पीएम किसानच्या सतराव्या हप्त्याअंतर्गत सुमारे 20 हजार कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. त्याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशाश्वमेध घाटावर प्रार्थना केली आणि काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जाहीर झाल्यानंतर, 17 व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात आले नसल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणीचा अभाव. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी केल्या नसतील त्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.

पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून 'पीएम किसान सन्मान निधी'च्या 17 व्या हफ्ता जारी केला. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील 9.26 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. तर याआधी 9 कोटी शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचा लाभ मिळाला होता.

9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी

आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटींचा लाभ

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला, तेव्हापासून देशभरातील कोट्यवधी शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत होते. आज सतरावा हप्ता रिलीज झाल्यानंतर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. पीएम किसान अंतर्गत आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट पाण्यात; वसईत पावसामुळे पाणीच पाणी, सुदैवाने कारमधील चौघे बचावले
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग
Embed widget