India’s Cucumber / Gherkins exports : कृषी क्षेत्रात भारत सध्या सर्वोत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळत आहे. तसेच अधुनिक साहित्यांच्या आधारावर उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहेत. त्याचंच उदाहरण म्हणजे भारताने काकडी आणि खि-याच्या निर्यातीत लक्षणीय कामगिरी केली आहे. काकडीची (Cucumber) निर्यात (Export) करणारा भारत जगातील सर्वात मोठा निर्यातदार ठरला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2020 -21 या काळात भारताने जगात काकडी आणि खिरी काकडीची एक लाख 23 हजार 846 मेट्रिक टन निर्यात केली आहे.
भारत जगात काकडीची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार ठरला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात (2020-21) भारताने जगात काकडी आणि खिरी काकडीची (Kheera Cucumber) 1,23,846 मेट्रिक टन म्हणजेच, 114 दक्षलक्ष डॉलर्सची (850 कोटी रुपये) निर्यात केली आहे. भारताने गेल्या आर्थिक वर्षात, कृषि प्रक्रिया उत्पादने, लोणच्याची काकडी (Pickel Cucumber) अशा पदार्थांच्या उत्पादनात, 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा (1664 कोटी रुपये) अधिक अधिक मूल्यांची निर्यात केली. जगभरात काकडी आणि लोणच्याची काकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कृषिमालात देशाच्या निर्यातीत वाढ केली आहे.
2020-21 या वर्षात, भारताने 2,23,515 मेट्रिक टन काकडीची, म्हणजेच 223 दशलक्ष डॉलर्स (1664 कोटी रुपये) मूल्यांच्या काकडीची निर्यात केली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, वाणिज्य विभागाच्या निर्देशांनुसार, कृषि आणि अन्नप्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ने पायाभूत विकास, जागतिक बाजारात उत्पादन प्रोत्साहन देण्याबाबत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याशिवाय, अन्नप्रक्रिया केंद्रात अन्न सुरक्षा व्यवस्थापनाच्याही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या -
Fertilizer Price : गेल्या महिन्यात 900 रुपयात मिळणारं पोटॅश खत आज 1800वर कसं? शेतकऱ्यांचे सवाल
पालघरचा चिकू 24 तासांत दिल्लीत; किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना फायदा
आटपाडी तालुक्यातील डाळींब शेतीवर 'पिन होल बोरर' किडीचे संकट; बागा काढून काटण्याची शेतकऱ्यांवर वेळ
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live