Cotton Procurement : नंदूरबारमध्ये (Nandurbar) भारतीय कापूस महामंडळाकडून (Cotton Corporation of India) कापूस खरेदी सुरु करण्यात आली आहे. सध्या कापसाला (Cotton) 8 हजार 400 रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, कापसाला वाढीवर दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची (Farmers) मागणी आहे. अशात खासगी व्यापारी कापसाचे दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


खासगी व्यापारी कापसाचे दर वाढवण्याची शक्यता


नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी कापूस खरेदी यार्डमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू झाली आहे. या ठिकाणी कापसाला 8 हजार 400 रुपयांचा दर मिळत आहे. पहिल्याच दिवशी कापूस खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. सीसीसीआयचे कापूस खरेदी सुरू झाल्याने खासगी व्यापारी कापसाचे दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीसीआय बाजार मूल्यानुसार दर देत असून खासगी व्यापाऱ्यांपेक्षा सीसीआयचे दर जास्त असल्यानं शेतकऱ्यांचा चांगल्या प्रतिसाद मिळेल असे चित्र आहे. तर दुसरीकडं शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी अजूनही काढला नसून, आता दर वाढण्याची अपेक्षा आहे. सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाल्यानं पहिल्याच दिवशी 130 वाहनातून कापूस विक्रीसाठी दाखल झाला होता. शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसात धनादेशाचा स्वरूपात सीसीआयतर्फे पैसे दिले जाणार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी सीसीसीआयला कापूस विक्री करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
 खरेदी केंद्र सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापसाचे दर वाढण्याची अपेक्षा आहे.


जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय


यंदा कापूस उत्पादन (Cotton production) चांगलं झाले आहे. मात्र, भाव कमी असल्यानं अद्यापपर्यंत केवळ पंधरा ते वीस टक्के कापूसच शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाहेर आणला आहे. दर कमी असल्यामुळं शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फटका कापूस जिनींग उद्योगाला बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील 150 पैकी 75 जीनींग या बंद ठेवल्या आहेत. तर उर्वरित ज्या सुरू आहेत त्या देखील निम्म्या क्षमतेने सुरु असल्यानं जिनींग उद्योग संकटात आला आहे. मागील वर्षी कापसाच्या गुणवत्तेनुसार 10 हजारापासून ते 13 हजार रुपयापर्यंत भाव मिळाला होता. यंदा मात्र, हा कापूस दर अद्यापही साडेआठ हजार रुपयांवर स्थिरावला असल्यानं अधिक भाव वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळ असलेला कापूस विक्रीसाठी न आणता तो घरातच राखून ठेवणं पसंत केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Cotton News : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकी, कमी दरामुळं कापूस साठवण्याचा निर्णय, जळगावमधील जीनिंग आणि प्रेसिंग उद्योगाला फटका