Milk Price : राज्यातील दूध उत्पादक शेतकरी (Farmers) सध्या अडचणीत सापडलेत. कारण दुधाच्या दरात (Milk Price) अचानक मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटाका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपयांचा दर मिळत होता. मात्र, सध्या दुधाला प्रति लिटरसाठी 27 रुपयांचा दर मिळत आहे. याच मुद्यावरुन किसान सभा आक्रमक झाली आहे. दुधाचा प्रतिलिटर 35 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली आहे. 


तर मंत्र्यांच्या दारात दूध ओतण्याचं काम करु...


दुधाचे दर पडू नये म्हणून राज्याचे दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये खासगी आणि सरकारी दूध संघाच्या संचालक प्रतिनिधींचा समावेश केला होता. मात्र, सध्या दुधाला कमी दर मिळत असताना समिती असेल मंत्री असतील काहीच भूमिका घेत नसल्याचे मत किसान सभेचे नेते अजित नवलेंनी व्यक्त केलं. दुधाला किमान 35 रुपयांचा दर मिळावा. सरकारनं याकडं लक्ष घालाव असे अजित नवले म्हणाले. जर दुधाला 35 रुपयांचा दर मिळाला नाही तर मंत्र्यांच्या दारात दूध ओतण्याचं काम आम्ही करु असा इशारा नवलेंनी दिलाय.


स्त्यावर उतरल्याशिवाय या राज्यात काहीच होणार नाही का?


दूध दराच्या मुद्द्यावरुन अजित नवलेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय या राज्यात काहीच होणार नाही का? असा सवाल अजित नवलेंनी केली आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचीही लूट सुरु आहे. हे दोत असताना गतिमान सरकार झोपले का? असा टोला नवेलेंनी लागावला.