Nanded Farmer Success Story : कोरडवाहू शेती करणे शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठया जिकीरीचे काम आहे. परंतु यातही सकारात्मता असेल तर काहीही अवघड नाही हे नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. देगलूर तालुक्यातील माळेगाव मक्ता येथील अनिल हणमंतराव इंगोले या उच्चशिक्षित शेतकऱ्यांने ही कमाल केली आहे. 22 एकर कोरडवाहू शेती, शेतात पारंपारिक पिके घेवून पाहिले, पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे इंगोले यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने 20 एकरात पेरू व 2 एकरात सिताफळ टप्या-टप्याने लागवड करण्यास सुरुवात केली. जिद्द आणि कष्टाच्या जीवावर आज ते वर्षाला 20 लाखांचे उत्पादन घेतायत. 


अनिल इंगोले यांनी शेतात अनेक‍ नवनवीन पिके घेवून प्रयोग केले. मग त्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेवून 22 एकर कोरडवाहू शेतात कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेतला. तसेच एमआयडीएच योजनेच्या अनुदानातून 34 बाय 34 बाय 4.70 आकारमानाचे सामुहिक शेततळे करुन घेतले. पाणी साठ्यामुळे फळबाग क्षेत्रात वरचेवर वाढ केली. 22 एकर पैकी 20 एकरात पेरू व 2 एकरात सिताफळ टप्या-टप्याने लागवड करण्यास सुरुवात केली. या फळबाग लागवडीतून इंगोले वर्षाला 20 लाखांचे उत्पादन घेतात. शेतीतील उत्पन्न आज मोहून टाकणारे असले तरी प्रत्यक्ष शेती करतांना खूप आव्हानाचा सामना करावा लागतो असे अनिल इंगोले यांनी सांगितले.


पेरू मोठया बाजारपेठेत विक्रीसाठी जातात 


फळबाग लागवडीसोबत ते सोयाबीनचे उत्पादन घेतात. त्यांच्या फळबागेत एकूण 11 हजार पेरू व सिताफळाची झाडे आहेत. या फळबागेसाठी त्यांनी शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेतला. या योजनेचे अर्थसहाय्य त्यांना तीन वर्षात टप्या-टप्याने मिळत आहे. यावर्षी त्यांनी 500 क्विंटल पेरूचे उत्पादन केले आहे. आजच्या घडीला त्यांचे पेरू व सिताफळे हैदराबाद, नांदेड, अमृतसर, सोलापूर, निजामाबाद या मोठया बाजारपेठेत विक्रीसाठी जातात. उत्पादन दर्जेदार असल्यामुळे त्यांच्या पेरू व सीताफळाला खूप मोठया प्रमाणात मागणी आहे. यातून त्यांना चांगला नफा मिळतो असे इंगोले यांनी सांगितले. 


एका एकरात 125 क्विंटल पेरूचे उत्पन्न 


तर पुढील वर्षात जवळपास दोन्ही हंगामात 1 हजार क्विंटल पेरूचे फळाचे उत्पादन मिळेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. एका एकरात 125 क्विंटल पेरूचे उत्पन्न हमखास होते. उत्पादन वाढीसाठी ते अनेक‍ प्रगतीशिल शेतकऱ्यांच्या भेटी घेतात.  त्यांच्या फळबागेत ते रासायनिक खतांचा वापर कमीतकमी करुन जास्तीतजास्त सेंद्रिय खताचा उपयोग करण्यावर भर देतात. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी त्यांच्या बहरलेल्या पेरूच्या आणि सीताफळाच्या बागेची पाहणी करण्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी भेट देतात.


इतर महत्वाच्या बातम्या :


Farmer Success Story : सेंद्रीय शेती व उत्कृष्ट गांडुळ खत निर्मिती, दहावी शिकलेल्या शेतकऱ्याने साधला उन्नतीचा मार्ग