Maharashtra : राज्यात वाढत्या उन्हाबरोबरच विविध भागात पशु खाद्य टंचाई निर्माण झालीये यासोबत चाऱ्याचे भाव वाढल्याने पशुपालन परवडत नसल्याने आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे संभाळलेले पशु आता कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलंच चित्र बुलढाण्यासह राज्यातील अनेक भागात बघायला मिळत आहे.


सातत्याने जाणावणारी पाणीटंचाई, पशुखाद्याचे आणि चाऱ्याचे वाढलेले भाव, यासंदर्भातील शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोचणे आदी कारणांमुळे जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ही स्थिती राज्यातील सर्वच दुष्काळी भागात कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. त्यामूळेच एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता दिवसेंदिवस कमी होत आहे. महागाई आणि चारा टंचाईमुळे काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई-गुरे-म्हशींची विक्री करण्याची वेळ बुलढाण्यासह राज्यातील पशुपालकांवर आली आहे. यासंदर्भात खामगाव येथील टीएमसी मार्केट यार्ड येथील गुरांच्या बाजारात परिसरातील पशुधन मोठ्या प्रमाणात कवडीमोल भागात विक्री केल्या जात आहेत.


राज्यात आधीच पशुधन दिवसेंदिवस कमी होत असताना आता गुरांच्या चाऱ्याचे भाव आवाक्याबाहेर जात असल्याने पशु पालकांना अगदी कवडीमोल भावात गुरे बाजारात विकावे लागत आहेत. राज्यात गुरांच्या चाऱ्याचे भाव पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.


# हिरवा चारा - 07 रु.प्रति किलो.
# मका पेंढी   - 30 रु.प्रति पेंढी
# कडबा कुट्टी - 5000 रु प्रति ट्रॉली.
# हरबरा कुटार - 8000 रु.प्रति ट्रॉली.
# तुरीच कुटार - 10,00 रु.प्रति ट्रॉली.


सध्या सर्वच गोष्टीने महागाईचा उच्चअंक गाठला असताना आता गुरांच्या चाऱ्यानेही आता सर्व रेकॉर्ड मोडले आहेत...गेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झाल्याने सोयाबीनचे वैरण वाया गेलं , सरकी ढेप व इतर पशुखाद्ये ही महागल्याने त्याचा फटका आता पशुपालक शेतकऱयांना बसत असल्याने आता अनेक शेतकरी आपल्या मुलाबाळांप्रमाणे वागविलेल्या जनावरांना सर्रास पशु बाजारात विक्रीसाठी आणत आहे आणि त्यामुळे मात्र पशु बाजारात मोठ्या प्रमाणात कवडीमोल भावात ही जनावरे विकल्या जात असल्याच चित्र आहे.....यासाठी शेतकरी अनेक कारणे सांगत आहेत...तर हिरव्या चाऱ्याला बाजारात मोठी मागणी वाढली असल्याने त्याचा भावही वधारला आहे.


दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या यांत्रिकी शेतीमुळे पशुधन कमी होत आहे आणि त्यातच आता वाढती चारा टंचाई व गगनाला भिडलेले चाऱ्याचे भाव यामुळे मात्र पशुपालक शेतकरी संकटात सापडला आहे , मात्र यामुळे आपण जगाव की पशूंना जगवाव या विवंचनेत पशुपालक सापडला असल्याने मिळेल त्या भावात शेतकरी आपले पशु विक्री करीत आहे.....समृद्ध म्हणविणाऱ्या महाराष्ट्राला मात्र हे न शोभणारी आहे. सरकार ने यावर लवकर तोडगा काढून पशुपालकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.