Maharashtra Budget 2022 : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. विदर्भ आणि मराठवाडा हे सोयाबीन आणि कापूस पिकाचे केंद्र आहे. त्यामुळे तेथील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि मूल्यसाखळी विकासासाठी येत्या 3 वर्षात 1 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कापसाची लागवड केली जाते. कापूस आणि सोयाबन पिकाचे केंद्र म्हणून या दोन्ही विभागाकडे बघितले जाते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या पिकांची उत्पादकात वाढवण्यासाठी आणि मुल्यसाखळी विकसीत करण्यासाठी येत्या 3 वर्षात 1 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
आणकी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे भुविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांकडे असणारे 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसेच भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामध्ये जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करेल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. काही राज्य या योजनेमधून बाहेर पडली असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Budget 2022 : शेतकऱ्यांना दिलासा, भूविकास बँकांचे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ, अजित पवारांची घोषणा
- Maharashtra Budget 2022 : शेतकऱ्यांना दिलासा, भूविकास बँकांचे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ, अजित पवारांची घोषणा
- Maharashtra Budget :'निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई' बजेट मांडताना अजितदादांचा शायराना अंदाज; दहा महत्वाच्या घोषणा