जालना : उत्तर महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून कापसाची (Cotton) लागवड केली जाते. ही लागवड दोन पद्धतीने केली जाते. ती म्हणजे कोरडवाहू आणि बागायती. बागायती कापसाची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते तर कोरडवाहू कापसाची पावसावर अवलंबून असते. वाढते तापमान आणि मागील वर्षी झालेल्या गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव या गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करतांना दक्षता घेणं महत्त्वाचे आहे.


 उत्तर महाराष्ट्रमध्ये कापसाची लागवड होत असते. मात्र शेतकऱ्यांनी कापूस लागवडीपूर्वी आपली शेती खोल नांगरणी करून घ्यावी. त्यामुळे जमिनीतील किडीचे कोष नष्ट होतात बागायती असेल सरी पद्धती करावा बागायती कापसाची लागवड करत असताना तापमानात वाढ झाल्याने आणि पाणी पातळी कमी असल्यामुळे बागायती शेतकऱ्यांनी मे च्या शेवटच्या आठवड्या ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड करण्यास प्राधान्य द्यावे. कोरडवाहू असेल तर 50 मिलीपेक्षा जास्त पाऊस  झाल्यावर लागवडीला सुरवात करावी.  गेल्या अनेक वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी हे गुलाबी बोंड अळीमुळं अडचणीत आले आहेत. कारण या बोंडअळीमुळं कापूस उत्पादनात मोठी घट होत आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा या राज्यातही बोंडअळीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. 


लागवड करताना काय काळजी घ्यावी?


कापसाची लागवड करताना अनेक बाबी महत्वाच्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची बाब म्हणजे मागील हंगामात ज्या क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. त्या क्षेत्रावर या वर्षी लागवड करू नये. बोंडआळी निंयत्रण करण्यासाठी कमी कालवधीत येणारे कापसाचे वाण निवडावेत तसेच नॉन बीटी रेफ्युजी शेताच्या आजूबाजूला लागवड करावी. 


 कोणत्या गोष्टीमुळे बोंडआळीचे निंयत्रण शक्य आहे?



  •  कापसाच्या लागवडीपूर्वी खोलवर मशागत करून घ्यावी त्यामुळे अळ्यांचे कोष नष्ट होतात

  • तापमानाचे प्रमाण जास्त असल्याने बागायती कापसाची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी

  •  बोंडअळीच्या नियंत्रणासाठी मागच्या वर्षी ज्या ठिकाणी कापसाची लागवड केली होती त्या ठिकाणी लागवड करू नये

  • शक्यतो शेतकऱ्यांनी कमी दिवसात उत्पन्न देणाऱ्या वाणाची लागवड करावी

  • कापसाचे अधिकृत bt बियाणे वापरावे त्या सोबत दिलेलं नॉन बीटी बियाणे बांधाच्या आजूबाजूला लावावीत

  • शक्यतो परिसीतील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी कापसाची लागवड करावी

  •  एकूणच लहान मोठ्या गोष्टींचा विचार केल्यास आणि योग्य नियोजन केल्यास कापसावरील बोंड आळीचा आणि इतर बाबीपासून सुटकारा मिळू शकतो. मात्र गरज  फक्त योग्य खबरदारी घेण्याची आहे.


हे ही वाचा :


Jalgaon: रेशीम शेतीने शेतकऱ्याला दिली आर्थिक साथ; जामनेरचा शेतकरी ठरतोय इतरांसाठी आदर्श