हिंगोली :  हिंगोली बाजार समितीनंतर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या बाजारपेठेसाठी राज्यात ओळखली जाते. वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात आज झालेल्या हळदीच्या विक्रीत उच्चांकी 11 हजार रुपयांचा दर मिळाला आहे.तर काल हिंगोलीच्या मार्केट यार्डात 7800 ते सव्वा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव मिळाला. सांगलीनंतर हिंगोली व त्यापाठोपाठ वसमत बाजारपेठेत हळदीला सध्या उच्चांकी दर मिळत आहे. 


मात्र, या वर्षी हळदीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव व पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.हिंगोली बाजार समितीनंतर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या बाजारपेठेसाठी राज्यात ओळखली जाते. मराठवाड्यासह विदर्भातून यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातून हिंगोलीच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला येते.


सांगली जिल्ह्यात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. हळदीची बाजार पेठ सांगलीची प्रसिद्ध आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये निजामुद्दीन, शेलम अशा बाहेरच्या राज्यातून हळदीची आवक होत असते. हळद ही गुणकारी आहे. शिवाय स्वयंपाकात लग्नसराईत हळदीचा महत्वाचा भाग आहे.  हळदीमध्ये करक्यूममचे प्रमाण जास्त असल्याने कोरोना काळात हळदीचे महत्व आणि वापर वाढला. सध्या भारतात आणि परदेशात अँटिबायोटिक म्हणून हळदीचा वापर केला जात असल्याने हळदीच्या पावडरची मागणी वाढली आहे


मागील दोन वर्षांपासून हळद हा शेतीमाल असल्याबाबतचा वाद सुरू होता. मात्र अखेर महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणनाने हळद शेतीमाल नसल्याचा निवाडा केला आहे. त्यामुळे हळदीला अखेर 5 टक्के जीएसटी लागू केला आहे.  हळद शेतीमालच आहे. हळद शिजवणे आणि वाळवणे ही उद्योगातील प्रक्रिया नाही. हे सर्व शेतकरीच करत असतो. त्यामुळे हळद हा शेतीमाल नसल्याच्या निर्णयाविरोधात कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकऱ्यांच्या वतीने जीएसटी विभागाकडे अपील केले जाणार आहे.



इतर महत्त्वाच्या बातम्या :