Pavitra Rishta Season 2 Trailer : छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. 2009 मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेमधील अर्चना आणि मानव ही जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मानवची तर अंकिता लोखंडेने अर्चनाची भूमिका साकारली होती. लवकरच या मालिकेचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'पवित्र रिश्ता सीझन 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मालिकेत अंकिता लोखंडे अर्चनाची भूमिका साकारणार आहे. तर शाहीर शेख मानवची भूमिका साकरणार आहे. 'पवित्र रिश्ता सीझन 2' प्रेक्षकांना झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. ट्रेलरमधील अंकिता आणि शाहीरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.





चाहत्यांच्या पसंतीस पडली होती 'पवित्र रिश्ता' मालिका
2021 मध्ये 'पवित्र रिश्ता' ही मालिका झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याने आता मालिकेचा दुसरा भागदेखील प्रदर्शित करण्यात येत आहे. 28 जानेवारीपासून 'पवित्र रिश्ता सीझन 2' प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


संबंधित बातम्या


Ala Vaikunthapurramuloo Hindi Teaser : अल्लू अर्जुनच्या 'अला वैंकुटापुर्रामुलू' सिनेमाचा हिंदी टीझर रिलीज


Zombivli Trailer : अमेय-ललितच्या 'झोंबिवली' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 26 जानेवारी रोजी चित्रपट होणार प्रदर्शित


Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा मुहूर्त ठरला, पोस्टर शेअर करत जाहीर केली रिलीज डेट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha