Beed Rain : मराठवाडा (marathwada) आणि विदर्भात (vidarbha) मुसळधार पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर यामुळं शेती पिकांचे देखील मोठं नुकसान झालं. बीड (Beed) जिल्ह्याला देखील या मुसळधार पावासाचा मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळं पुराच्या पाण्यातून वाट काढताना शेतकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. बीड तालुक्यातील केसापूर येथील एका ओढ्याला पूर आल्यानं शेतकऱ्यांना आणि मजुरांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराचं पाणी शेतात घुसल्यानं उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बीड तालुक्यातील केसापूर परभणी येथील एका ओढ्याला पूर आल्यान शेतात गेलेल्या मजुरांना आणि शेतकऱ्यांना या पुराच्या पाण्यातून रस्सीच्या सहाय्याने ओढा पार करावा लागला. विशेष म्हणजे महिलांनी आपला जीव धोक्यात घालून या पुराच्या पाण्यातून आपली वाट मोकळी केली. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी बैलगाडी घेऊन पुराच्या पाण्यातून ओढा पार केला आहे.
बीड जिल्ह्यात शेती पिकांचं मोठं नुकसान
दरम्यान, मुसळधार पावसामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पुराच्या पाण्यामुळं सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना मोठा फटका बसला आहे. तर अनेक ठिकाणी शेतजमीनी खरडून गेल्या आहेत.
मराठवाड्यात पावनेचार लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान
मराठवाड्यात पुरामुळं आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वीज पडून 25 जणांचा मृत्यू झाला असून भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. एकूण आत्तापर्यंत मराठवाड्यात 45 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अतिवृष्टीमुळे आतापर्यंत लहान मोठ्या अशा 449 जनावरांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधार पावसामुळं शेतीच्या पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. आत्तापर्यंत मराठवाड्या 3 लाख 78 हजार 866 हेक्टर जमिनीवरील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. तर 2 लाख 34 हजार 809 शेतकरी या पावसामुळं बाधित झाले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयानं याबाबतची माहिती दिली आहे. शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत सध्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा सुरु असून, शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: