Rain News : राज्याच्या काही भागात मुसळधार पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आल्यानं जिल्ह्यातील नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. या पावसात कुणाचे घर पडले तर कुणाचे शेतच खरवडून गेलं आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. पुरामुळं जवळपास 40 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. 


दोन दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं यवतमाळ जिल्ह्यात न भरुन निघणारी हानी झाली आहे. जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या काठावरील अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. या पुरामुळे नागरिकांनी अक्षरशः रात्र जागून आपला जीव वाचवला आहे. Sdfr च्या दोन पथकाच्या सहाय्याने साडेपाच हजार नागरिकांना  पुराच्या पाण्याचा वेडा पडला होता. अडकलेल्यां सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तर पुरामुळं जवळपास 40 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भयंकर पाऊस असल्याचे बोलल्या जाते. यात कुणाचे घर पडले तर कुणाचे शेत खरडून गेले. 


लेवा या गावाला पैनगंगा नदीच्या पुराचा वेढा 


महागावच्या लेवा या गावाला पैनगंगा नदीच्या पुराचा वेढा बसला आहे. गावातील नाल्या काठावरील 300 ते 400 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झालं आहे. ऊस, हळद, कापूस, सोयाबीन ही पीकं पूर्णपणे खरडून गेली आहेत. शेतातील ओलिताची साहित्य स्प्रिंकलर पाईप वाहून गेले आहेत. काही ठिकणी तर विहीर संपूर्ण गाळाने भरून गेल्या आहेत. पुरामुळं शेतजमिनीवर वाहून आलेल्या दगडामुळं आता ही जमीन किमान 10 वर्षे तरी शेतीयोग्य होणार नसल्यानं आता पीक कसे घ्यावे? असा प्रश शेतकऱ्यांसमोर उभा आहे. 


शासनाने त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी


मध्यरात्रीपासून सुरू असलेला पाऊस हा इतका भयानक होता की नाल्याच्या काठावरील घरात अक्षरशा सहा ते सात फूट पाणी साचले होते. घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. अद्यापही घरात ओल असून पुन्हा अशी परिस्थिती आल्यास संपूर्ण घर पडल्याशिवाय राहणार नाही अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आर्त टोहो शेतकरी आणि आपघातग्रस्त नागिरक करत आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण आणि पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.  नुकसान भरपाई मिळाली तरी ती सुद्धा तोकडीच राहणार असणार आहे. झालेलं नुकसान भरून कसे निघणार असा प्रश्न आता या सर्व पूरग्रस्त नागरिकांना पडला आहे


महत्त्वाच्या बातम्या:


Rain News : पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क