नवी दिल्ली: प्राथमिक कृषी पत संस्था (Primary Agriculture Credit Societies- PACS) आता डिजिटल आणि अत्याधुनिक होणार आहेत. केंद्र सरकारने प्राथमिक कृषी पत संस्थांच्या संगणकीकरणासाठी 2,516 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील 63 हजार प्राथमिक कृषी पत संस्थांचे डिजिटायझेशन होणार असून त्याचा 13 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती आहे. 


 






ग्रामीण भागाच्या विकासामध्ये प्राथमिक कृषी पत संस्थांचं महत्त्व मोठं आहे. त्या माध्यमातूनच अनेक शेतकऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाण करता येते. त्यामुळे ग्रामीण भागाचा गाडाही चालत राहतो. आता याच प्राथमिक कृषी पत संस्थांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारने 2,516 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज दिली. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा देशातील 13 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असंही ते म्हणाले. तसेच केंद्राच्या या निर्णयामुळे प्राथमिक कृषी पत संस्थांच्या कारभारामध्ये पारदर्शकता येईल असं अनुराग ठाकूर म्हणाले. 


 






महत्त्वाच्या बातम्या :