Wheat News : इजिप्तनं भारताकडून 1 लाख 80 हजार टन गहू विकत घेण्याचा करार केला आहे. जगातील सर्वात मोठ्या गहू आयातदारांपैकी इजिप्त हा एक देश आहे. इजिप्तने अलिकडच्या काळात समुद्रातून बरेच धान्य खरेदी केले आहे. परंतु रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळं ही आयात विस्कळीत झाली आहे. या संघर्षामुळे गव्हाचा आयात खर्चही वाढला आहे. इजिप्त त्याच्या 103 दशलक्ष लोकसंख्येपैकी 70 दशलक्षांपेक्षा जास्त लोकांना मोठ्या प्रमाणात अनुदानित ब्रेड उपलब्ध करुन देण्यासाठी प्रामुख्याने आयात केलेल्या गव्हावर अवलंबून आहे.
दरम्यान, भारताकडून 5 लाख टन गव्हाची खरेदी करण्याचे इजिप्तने ठरवले होते. मात्र, भारतानं गेल्या महिय्ता गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, इजिप्तसारख्या देशांना अन्न सुरक्षेच्या गरजा असलेल्या देशांना भत्ते दिले. आम्ही 5 लाख टन गव्हाची आयात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या 1 लाख 80 हजार टन गव्हाची खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागच्या काही दिवसांपूर्वी भारताने गहू निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने देशासह जगभरात याचे पडसाद उमटले होते. दरम्यान रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं जगभरात गव्हाची टंचाई भासू लागली आहे. युक्रेन पाठोपाठ भारत हा दुसरा गहू निर्यातदार उत्पादक असल्याने भारताकडून गहू निर्यातीची मागणी वाढली आहे. भारताला सध्या खतांची गरज असल्याने भारत आणि इजिप्त यांच्यात करार होण्याची शक्यता आहे. भारताकडून गहू इजिप्तला निर्यात करायचा आणि इजिप्तने भारताला खतांबरोबर इतर संसाधने देण्याचा करार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इजिप्तच्या सरकारने भारताकडून अर्धा दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे मे महिन्यात मान्य केले होते. याबाबत इजिप्तचे पुरवठा मंत्री अली मोसेल्ही यांनी माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. इजिप्त हा जगातील सर्वात मोठ्या गहू आयातदारांपैकी एक देश आहे. सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे इजिप्तला गव्हाची कमतरता भासते आहे. यामुळे इजिप्त आयातीसाठी पर्याय शोधत आहे. परंतु धान्य इजिप्तला गहू निर्यात करणारे जे दोन्ही प्रमुख देश आहेत त्यावर रशियाच्या युक्रेनवर आक्रमणामुळे व्यत्यय आणत आहेत.