Farming with Israel Technique : इस्रायलच्या तंत्रज्ञानाची (israel technique) सातत्यानं जगात चर्चा होत असते. मग ते शेतीतलं तंत्रज्ञान असो किंवा संरक्षणातील असो, इस्रायल नेहमी चर्चेत असते. दिवसेंदिवस भारतीय शेतीत देखील इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. देशातील अनेक शेतकरी इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यामाध्यमातून भरघोस नफा मिळवत असल्याचं चित्र दिसत आहे. 


इस्रायली तंत्रज्ञानामध्ये शेतीमध्ये वापरल्या जाणार्‍या नवनवीन प्रणालींचा समावेश आहे. यामुळेच भारतीय शेतकऱ्यांना देखील इस्रायली तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सांगितले जात आहे. भारतातील अनेक शेतकरी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करत आहेत. यामाध्यमातून चांगला नफा मिळवत आहेत. जाणून घेऊयात इस्रायलचे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय? तिथं शेतीसाठी कोणकोणत्या तंत्रांचा वापर केला जातो. त्यामाध्यमातून शेतकरी भरघोस कमाई कसे करतात ते पाहुयात. 


पर्यावरण नियंत्रित करुन शेती केली जाते


फळे, फुले आणि भाजीपाला यांच्या आधुनिक लागवडीसाठी इस्रायलमध्ये अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. भारत आणि इस्रायलमध्ये कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी अनेक करारही झाले आहेत. या करारांमध्ये संरक्षित शेतीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. भारतीय शेतकऱ्यांनी इस्रायलकडून शिकलेल्या संरक्षित शेती तंत्रामुळे कोणत्याही हंगामात कोणतेही फळे खायला मिळतात. या तंत्राच्या साहाय्याने पर्यावरण नियंत्रित करुन शेती केली जाते.


पिकानुसार वातावरण तयार 


इस्रायलच्या तंत्रज्ञानामध्ये कीटकनाशक नेट हाउस, ग्रीन हाऊस, प्लॅस्टिक लो-हाय बोगदे आणि ठिबक सिंचन यांचा समावेश आहे. बाहेरचे हवामान कसेही असले तरी या तंत्रज्ञानाद्वारे फळे, फुले, भाजीपाला यानुसार वातावरण तयार केले जाते. त्यामुळं शेतकरी बांधव अनेक प्रकारची पिके चांगल्या पध्दतीनं घेऊ शकतात. तसेच या पिकांच्या माध्यमातून भरघोस नफाही मिळवू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं शेतकऱ्यांना पिकांसाठी दुप्पट भावही मिळत आहे. 


तंत्रज्ञान आणि नावीन्याचा ध्यास 


तंत्रज्ञान आणि नावीन्याचा ध्यास इस्रायलच्या शेती क्षेत्रात पदोपदी जाणवतो. पाण्याची कमतरता आणि शेतीला योग्य नसलेली रेताड जमीन या संकटांशी झुंज देत येथे समृद्धीचे मळे फुलले आहेत. शेतीचे अफलातून रूप या देशात बघायला मिळते. तंत्रज्ञानाच्या जोरावर काटेकोर शेती आणि प्लॅस्टिकल्चरचा वापर करून इस्रायल जागतिक यशोगाथा बनला आहे. अन्न आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, कौशल्ये आणि साधने, पॅकेजिंग, अन्न गोठवणूक तंत्रज्ञान हे विषय या क्षेत्रात येतात. पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वापरायचा, याचा धडा इस्रायलने जगाला दिला. शिवाय मत्स्योत्पादनातही या देशाने कमाल करून दाखवली. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीत नवे मापदंड उभे केले. समुद्राचे खारे पाणी वळवून ‘केजफिश फार्मिंग’ अत्यंत यशस्वी केले.


महत्त्वाच्या बातम्या:


Israel Hamas Conflict : इस्त्रायल आणि हमासचे युद्ध भारत थांबवू शकतो का? भारत मध्यस्थी करू शकतो का? पॅलेस्टाईनचे राजदूत थेटच म्हणाले...