Israel Hamas War: इस्रायल देश आणि हमास (Hamas) या अतिरेकी संघटनेत सध्या युद्ध सुरू असून त्यात आतापर्यंत शेकडो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायल (Israel) देखील आता चांगलाच खवळला आहे. हमासचं अस्तित्व कायमचं नष्ट करू, असा पवित्रा इस्रायलने घेतला आहे. हमासचे सैनिकही सातत्याने इस्रायलवर हल्ले करत आहेत. इस्रायलवर हमासचा हा पहिला हल्ला नाही, याआधीही हमासने अनेकदा इस्रायलवर असे हल्ले केले आहेत, ज्यांना इस्रायलने नेहमीच चोख प्रत्युत्तर दिलं आहे.


इस्रायलमध्ये राहतात सर्वाधिक ज्यू


इस्रायल हा जगातील एकमेव देश आहे जिथे सर्वाधिक ज्यू लोक राहतात. 1948 मध्ये ज्यूंनी स्वतःचा वेगळा देश म्हणून इस्रायलची निर्मिती केली. इस्रायलची निर्मिती झाली आणि अगदी तेव्हाच शेजारील सर्व मुस्लिम शेजारी देश इस्रायलचे शत्रू बनले. या शत्रू देशांकडून इस्रायलवर अनेकवेळा हल्ले झाले, पण या छोट्याशा देशाने आपली ताकद इतकी मजबूत केली की शत्रू त्याचे कधीही नुकसान करू शकले नाहीत.


ज्यूंची एकूण संख्या किती?


जर इस्रायलमधील एकूण ज्यूंच्या संख्येबद्दल बोलायचं झालं तर इस्रायलमध्ये 70 लाखांच्या जवळपास ज्यू राहतात, जे तेथील एकूण लोकसंख्येच्या सुमारे 74% आहे. जर जगातील ज्यूंच्या एकूण लोकसंख्येबद्दल बोलायचं झालं, तर ती सुमारे 1 कोटी 74 लाख आहे. म्हणजे जगातील 43 टक्के ज्यू लोक इस्रायलमध्ये राहतात.


आणखी कोणत्या देशात ज्यू राहतात?


आता प्रश्न असा आहे की इस्रायल व्यतिरिक्त जगातील कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक ज्यू राहतात? तर इस्रायलशिवाय अमेरिका आणि कॅनडामध्ये सर्वाधिक ज्यू राहतात. या दोन देशांमध्ये सुमारे 43 टक्के ज्यू राहतात. उर्वरित 24 टक्के ज्यू जगातील इतर देशांमध्ये स्थायिक आहेत. भारताच्या नेपाळ सीमेलगत देखील ज्यू लोक राहतात. महाराष्ट्रातही जवळपास 3 हजार ज्यू लोक राहतात.


सध्या ज्यूंचा देश असलेला इस्रायल आणि अतिरेकी संघटना हमासशी यांच्यात युद्ध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सातत्याने रॉकेटचा वर्षाव होत आहे. तर अतिरेकी संघटना हमासला धडा शिकवूनच हे युद्ध संपवू, असं इस्रायलचं म्हणणं आहे. इस्रायल हा ज्यू देश आहे आणि तोही खूप लहान आहे, त्याचे सर्व शेजारी मुस्लिम देश आहेत. त्यांपैकी बहुतेक इस्रायलचे कट्टर शत्रू आहेत, जे कधीही त्यांच्यावर हल्ला करण्यास तयार असतात. इस्रायल सुमारे 13 मुस्लिम देशांनी वेढलेला आहे.


हेही वाचा:


Israel Hamas War: 'या' 13 मुस्लिम देशांनी घेरलेला आहे इस्रायल; चारही दिशांना शत्रूचा वावर