Anil Ghanwat : केंद्र सरकारनं नुकत्याचा 14 पिकांच्या आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. या किंमतीवरुन काही शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पिकांचा उत्पादन खर्च पाहता आधारभूत किंमतीत केलेली वाढ ही तुटपुंजी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे प्रमुख आणि शेतकरी नेते अनिल घनवट ( Anil Ghanwat) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वाढीव उत्पादन खर्चाच्या तुलनेत केंद्र सरकारनं केलेली वाढ ही तुटपुंजी असल्याचे अनिल घनवट यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणालेत अनिल घनवट
केंद्र सरकारनं पिकांच्या आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. यावर शेतकरी नेते अिल घनवट यांनी टीका केली आहे. वाढीव उत्पादन खर्चाच्या तुलनेत सरकारनं केलेली वाढ तुटपुंजी आहे. वाढ केली असली तरी भात सोडून इतर पिकांची खरेदी नगन्य आहे. त्यामुळं शेतकर्यांना फायदा होणार नसल्याचं घनवट यांनी म्हटलं आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारनं पिकांच्या आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकारनं यंदाच्या 2022-23 च्या हंगामात 14 पिकांचे किमान हमीभाव जाहीर केले आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. पिकांच्या हमीभावात 100 ते 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळं शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
हमीभावाच्या संदर्भात वाढता उत्पादन खर्च आणि सध्याची एमएसपी, एमएसपी आणि प्रत्यक्षातील अंमलबजावणी आणि सध्याचे बाजारभाव आणि प्रत्यक्षात मिळणारी एमएसपी असे काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
एमएसपी (MSP) म्हणजे काय?
किमान आधारभूत किंमत ही किमान किंमत असते. ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. सरकार शेतकऱ्याला त्याच्याकडून खरेदी केलेल्या पिकावर जे पैसे देते त्याला एमएसपी म्हणजे हमीभाव म्हणतात. रब्बी आणि खरीप हंगामात वर्षातून दोनदा कृषी खर्च आणि मुल्य आयोगाच्या (CACP) शिफारसीनुसार सरकारकडून किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते.
महत्वाच्या बातम्या: