PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत 'ई-केवायसी' करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थ्यांना सहजरित्या लाभ मिळावा यासाठी यावा केंद्र सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख  पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी  31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं ज्या लाभार्थ्यांनी 31 आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना ती 31 जुलैच्या आत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

  
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबियाला प्रत्येक चार महिन्याला 2 हजार रुपयांचा हप्ता दिला दातो. 3 हप्त्यात 6000 रुपयांचा लाभ प्रती वर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतो. आज अखेर या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील 1 कोटी 9 लाख 46 हजार  लाभार्थ्यांना एकूण 18 हजार 151 कोटी 70 लाख रुपयांचा लाभ अदा करण्यात आला आहे.


लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यापूर्वी ई-केवायसी 31 मे 2022 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पीएम किसान पोर्टलवरील लिंकद्वारे लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम 15 रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारण्यात येणार आहे. 


महाराष्ट्रात 26 मे 2022 अखेर एकुण 52 लाख 82 हजार लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्रच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या 31 जुलै 2022 च्या मुदतीपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन उपआयुक्त (कृषी गणना) तथा पथक प्रमुख, पी.एम.किसान विनयकुमार आवटे यांनी केले आहे.