Dadaji Bhuse : राज्यात खरीप हंगामाचे क्षेत्र 1 कोटी 45 लक्ष हेक्टर आहे. येत्या खरीप हंगाम 2022 साठी एकूण 52 लक्ष मेट्रिक टन खतांची मागणी केली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. मागणी केलेल्या खतांमध्ये युरिया, डीएपी, एसओपी, NPK, SSP या खतांचा समावेश आहे. दरम्यान, खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकांचे 85 लक्ष क्षेत्र आहे. त्यासाठी पेरणीच्या वेळीच खते द्यावी लागतात, त्यामुळं ज्यादा खतांची मागणी करण्यात आली आहे.
राज्यात येत्या खरीप हंगाम 2022 साठी खतांची उपलब्धता, प्रधानमंत्री पिक विमा योजना अंमलबजावणी व अनुषंगिक विषयासंदर्भात मुंबई कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने 45 लक्ष मेट्रिक टन आवटंन मंजूर केले आहे. हे मंजूर आवंटन वाढवावे व आवंटनानुसार प्रामुख्याने एप्रिल, मे, जूनमध्ये उपलब्ध व्हावी यासंदर्भात दिल्ली येथे संबंधित मंत्री महोदयांची भेट घेऊन निवेदन पत्र दिले असल्याचे भुसे यांनी सांगितले.
दरम्यान, पीक विमा कंपन्यांसाठी नफा व तोटा यामध्ये संतुलन राखणारे बीड मॉडेल प्रस्तावीत करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. येत्या खंरीप हंगामात ते राबविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. सन 2020-21 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले. परंतू कोरोना काळात शेतकरी विमा कंपन्यांना पूर्वसुचना देवू शकले नाहीत. एनडीआरएफ अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना मदत केली. ते पंचनाम गृहीत धरुन खरीप हंगाम 2020 मधीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यंन मदत देण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करण्यात आल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांचीही दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतीसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्रामध्ये फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. या पार्श्वभूमीवर फळांचे संरक्षण करण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन अभियानामध्ये फळबागांसाठी प्लास्टिक कवर व नेट (जाळी) चा समावेश करणे. या अभियानामधील घटकांचे मापदंड वाढवणे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना या विषयांवर दादाजी भुसे यांनी तोमर यांच्या सविस्तर चर्चा केली. यावेळी दादाजी भुसे यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे, खासदार हेमंत पाटील, खासदार राजेंद्र गावीत, खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. केळी करपा नियंत्रणासाठी केळी पिकाचा केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश करावा अशी मागणी कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्याकडे खासदार रक्षा खडसे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या:
- Dadaji Bhuse : दादाजी भुसे यांच्यासह राज्यातील खासदारांनी घेतली केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांची भेट, विविध विषयांवर चर्चा
- Junnar Hapus : हापूस फक्त कोकणचाच, जुन्नरच्या हापूसला भौगोलिक मानांकन देण्यासाठी कोकणच्या शेतकऱ्यांचा विरोध