Dadaji Bhuse : महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतीसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्रामध्ये फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. या पार्श्वभूमीवर फळांचे संरक्षण करण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन अभियानामध्ये फळबागांसाठी प्लास्टिक कवर व नेट (जाळी) चा समावेश करणे. या अभियानामधील घटकांचे मापदंड वाढवणे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना या विषयांवर दादाजी भुसे यांनी तोमर यांच्या सविस्तर चर्चा केली.
दरम्यान, यावेळी दादाजी भुसे यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे, खासदार हेमंत पाटील, खासदार राजेंद्र गावीत, खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. केळी करपा नियंत्रणासाठी केळी पिकाचा केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश करावा अशी मागणी कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्याकडे खासदार रक्षा खडसे यांनी केली.
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादन घेणारा राज्यातील मोठा जिल्हा आहे. त्यामुळे केळी करपा नियंतर्णासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदान मिळावी असी मागणी यावेळी करण्यात आली. यावर 8 दिवसात महाराष्ट्र राज्याने प्रस्ताव सादर करावा असे केंद्रीय राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी सुचना दिल्या आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये सन 2010-11 ते 2016-17 या 7 ते 8 वर्षामध्ये केळी करपा योजना राबविण्यात आली होती. त्यामुळं जिल्ह्यातील केळीवर नेहमी येणारा करपा हा रोग बऱ्याच प्रमाणत नियंत्रणात आला होता. परंतू, गेल्या 4 ते 5 वर्षापासून सदरील योजना कृषी विभागामार्फत शासकीय अनुदानावर राबविण्याचे बंद केल्यामुळं जिल्ह्यामध्ये केळीवरील करपा रोग वाढण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. केळी करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी ज्या निविष्ठांचा वापर करण्यात येत होता, त्या सर्व निविष्ठा शेतकर्यांना एका ठिकाणी उपलब्ध होत नसल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- कांदा उत्पादकांवर दुहेरी संकट; एकीकडे मालाला भाव नाही, तर दुसरीकडे ऊन आणि अवकाळीच्या अंदाजामुळे बळीराजा चिंतेत
- Junnar Hapus : हापूस फक्त कोकणचाच, जुन्नरच्या हापूसला भौगोलिक मानांकन देण्यासाठी कोकणच्या शेतकऱ्यांचा विरोध