Bhandara Latest News Update : मजूर टंचाईने त्रस्त झालेल्या महिला शेतकऱ्याने भन्नाट आयडिया करून ड्रोनद्वारे शेतात कीटकनाशक फवारणीचा यशस्वी प्रयोग केला आहे. भंडारा जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील जाम्ब येथील मनीषा नागलवाडे नामक महिला शेतकरीने आपल्या शेतात हा प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन द्वारे फवारणीच्या प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. ह्या प्रयोगा दरम्यान परिसरातील शेकडो शेतकरी त्यावेळी उपस्थित होते. ह्या प्रयोगामुळे वेळ, कीटकनाशक, पैसा आणि मनुष्यबळाची बचत होत असल्याचे सांगण्यात आले आहे.


भंडारा जिल्ह्यात धान्यासोबतच भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, भंडारा जिल्ह्यात रोजगार हमी चे कामे भरपूर सुरु असल्याने शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. वेळोवेळी फवारणीच्या कामाला तर कुणीही मजूर येत नव्हता. त्यावर तोडगा काढण्यासाठी ड्रोनने फवारणी करण्याचा प्रयोग जेवनाळा येथील प्रगतशील महिला शेतकरी मनीषा नागलवाडे यांच्या शेतात केला आहे. ह्यावेळी धान्य शेतीवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली. विशेष म्हणजे ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य असून एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने ड्रोनद्वारे करता येत आहे. 30 मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लीटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता असल्याने एकावेळी चार नोझलद्वारे फवारणी करता येत आहे. त्यामुळे अगदी कमी वेळात आणि कमी मनुष्यबळात ही फवारणी होत असल्याची माहिती शेतमालकाने दिली आहे. 
 
विशेष म्हणजे अर्थसंकल्पात ड्रोन द्वारे कीटनाशक फवारणी साठी केंद्र सरकार अर्थ सहाय्य करणार असल्याचे स्पष्ठ झाले असताना भंडारा जिल्ह्यात करण्यात आलेला प्रयोग वाखण्याजोगे आहे है नक्की म्हणावे लागेल. एकंदरित हे तंत्रज्ञान इस्राइल सारख्या प्रगत देशात पहायला मिळते. तसे असताना आता देशात त्यात ही महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पहायला मिळत असेल तर नक्कीच "मेरा देश बदल रहा है" म्हणन्याची वेळ आली आहे. 


 आणखी महत्वाच्या बातम्या :
Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश
Aurangabad: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली, यावर्षी गळीत हंगाम लवकर सुरु होणार; सहकार मंत्र्याची माहिती 


Agriculture News : घोणस अळी आली तशी जाईल, भीती बाळगू नका : किटकशास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे