Nandurbar Banana News : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी (Banana Farmers) अडचणीत आला आहे. कारण शेतकऱ्यांना प्रति क्विंटलला केवळ तीनशे रुपयांचा दर मिळत आहे. तर दुसरीकडं बाजारात मात्र, ग्राहकांना 40 ते 50 रुपये डझनच्या दरानं केळीची विक्री केली जात आहे. दरम्यान, केळीचं उत्पादन सुरु झाल्यानंतर व्यापारी खरेदी करताना मनमानी करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.


नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जात असते. मागील जून महिन्यात लागवड केलेल्या केळीचे उत्पादन सध्या सुरु झालं आहे. तर काही ठिकाणी केळी काढण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी केळीच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, आता उत्पादन सुरु झाल्यानंतर व्यापारी केळीच्या खरेदी करताना मनमानी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे रुपयांचा दर मिळत आहे. तर दुसरीकडे बाजारात मात्र, ग्राहकांना चाळीस ते पन्नास रुपये डझन दराने केळीची विक्री केली जात आहे.




राज्य शासनाने केळीच्या संदर्भात ठोस भूमिका घ्यावी, शेतकऱ्यांची मागणी


दरम्यान, व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात केळीची खरेदी करुन सर्वसामान्य ग्राहकांना ते अव्वाच्या सव्वा भावाने विकली जात आहे. आता स्वतःची केळी स्वतः विकण्याचा विचार करत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. केळी खरेदी संदर्भात व्यापाऱ्यांची अशीच मनमानी चालली तर येत्या काळात नंदूरबार जिल्ह्यातील केळीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने केळीच्या संदर्भात ठोस अशी भूमिका घेण्याची मागणी नंदूरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.


माल भरपूर असल्यामुळं कुठं घेऊन जावा हे कळत नाही


मागील वर्षी जून महिन्यात केळीची लागवड केली आहे. तीन एकर क्षेत्रावर पाच हजार झाडं लावली आहेत. याला आत्तापर्यंत दीड लाख रुपयांचा खर्च आला आहे. आत्तापर्यंत 70 हजार रुपयांची केळी झाली आहे. मात्र, सध्या केळीला कमी दर मिळत आहे. त्यामुळं मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.  सध्या व्यापारी 300 ते 400 रुपये क्विंटलने मालाची खरेदी करत आहेत. तर शहरात 40 ते 50 रुपये डझनने केळाची विक्री करत आहेत. त्यामुळ व्यापाऱ्याला माल द्यावा की स्वत: मालाची विक्री करावी हे समजत नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. माल भरपूर असल्यामुळं कुठं घेऊन जावा हे कळत नाही, त्यामुळं नाईलाजाने व्यापाऱ्याला माल द्यावा लागतो असे शेतकऱ्याने सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: