Koyna Dam : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, मागच्या तीन ते चार दिवसाखाली झालेल्या पावसामुळं धरण आणि नदी नाल्यांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून प्रशासन सतर्क झालं आहे. कोयना धरणात (Koyna Dam) देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळं आज सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. आज कोयना धरणाचे दरवाजे 4 फुट 6 इंचाने उघडण्यात येणार असून, धरणातून 32 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.


नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


सध्या कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.  त्यामुळं प्रशासन सतर्क झालं आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणात सध्या 98 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याची आवक 22 हजारापेक्षा जास्त आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे, तरीही सतर्कता म्हणून कोयना प्रशासनानं निर्णय घेतला आहे. सध्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग चालू असल्याने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 32000 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. 


धरणाची 105 टीएमसी पाणी क्षमता 


महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाला ओळखलं जातं. या धरणाची 105 टीएमसी पाणी क्षमता आहे. जूनमध्ये पावसानं दडी मारल्यानं धरणाचा पाणीसाठा खूप कमी झाला होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पुराचा कोणताही धोका उद्भवू नये म्हणून प्रशासन सतर्क झालं आहे.


जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती पिकांचे देखील या पावसामुळं नुकसान झालं होतं. ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.  पावसाळ्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस झाल्याचं हवामान खात्यानं सांगितले आहे. राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे दिसत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: