Himanta Biswa Sarma : आसाममध्ये दरवर्षी सुमारे 3.1 लाख मेट्रिक टन मसाल्यांचे उत्पादन होत असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. आले, हळद, धणे, मोहरी, मिरची, लसूण या मसाल्यांच्या उत्पादनात राज्याचा मोठा वाटा आहे.  सध्याच्या परिस्थितीत, संपूर्ण जग निरोगी अन्न शोधत आहे. जे अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीचे आहे. तसेच कोणत्याही रासायनिक खतांपासून मुक्त आहे, असेही सरमा म्हणाले. 


गुवाहाटी येथे ईशान्य क्षेत्रासाठी भारतीय मसाला मंडळाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय खरेदीदार विक्रेता मेळाव्यात हेमंत सरमा बोलत होते. यावेळी प्रमुख विदेशी खरेदीदार, प्रमुख निर्यातदार, शेतकरी आणि व्यापारी सहभागी झाले होते. भारताच्या पारंपारिक मसाले, औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पतींच्या समृद्ध वारशाचा जगभरात प्रचार करण्यात येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आसाममधील  मसाले आणि तत्सम उत्पादनांची वाढ आणि विकास सुलभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असेही सरमा म्हणाले.


भारत हा त्याच्या घरगुती मसाल्यांसाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो असेही सरमा म्हणाले. देशातील मसाले आणि औषधी वनस्पतींचा नियमितपणे उपचारात्मक गुणधर्मांसाठी वापर केला जातो. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशनने सूचीबद्ध केलेल्या 109 जातींपैकी 75 मसाल्यांचे उत्पादन भारत करत असल्याचे त्यांनी हेमंत सरमा यांनी सांगितलं. देश आज जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारच्या मसाल्यांचे एकूण उत्पादन वेगाने वाढत आहे, असे त्यांनी नमूद केले.


सेंद्रिय मानल्या जाणार्‍या मसाल्यांच्या गुणवत्तेसाठी ईशान्य बारताची ओळख आहे. अनेक चांगल्या उत्पादनांसाठी आणि वैशिष्ट्यांसाठी आसामचा प्रदेश प्रसिद्ध आहे. जागतिक मागणी असलेल्या मसाल्यांना विशेष मान्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की आसाममध्ये दरवर्षी सुमारे 3.1 लाख मेट्रिक टन मसाल्यांचे उत्पादन होते. आले, हळद, धणे, मोहरी, मिरची, लसूण इत्यादी मसाल्यांच्या उत्पादनात राज्याचा मोठा वाटा आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी आणि जलदगतीने पायाभूत सुविधांचा विकास होत असल्याचे सरमा यावेळी म्हणाले.