Agriculture News : राज्याच्या काही भागात जोरदार (Rain) पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चांगला पाऊस झाल्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी शेतकरी पेरणी करत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातही दमदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता पेरण्यांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 10 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या 15 दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. अखेर अहमदनगर जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळं शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी आता पेरण्यांना सुरुवात केली असून अहमदनगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये साडेचार लाख हेक्टर क्षेत्र हे प्रस्तावित आहे. त्यापैकी 10 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात 18 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड
अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळं अनेक ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला आहे. त्यामुळं पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. सध्या झालेल्या पेरणीमध्ये सर्वाधिक पेरणी ही कपाशीची झाले आहे. यामध्ये जवळपास 18 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी कालव्यांद्वारे शेतीला पाणीपुरवठा होतो, त्या भागामध्ये सर्वाधिक पेरणी झाली आहे. कपाशीच्या खालोखाल सोयाबीनचा साडेपाच हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, यंदा पाऊस उशिराने झाल्याने मुगाचे क्षेत्र हे कमी झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी जरी पेरणी सुरु केली असली तरी त्यांना आणखी पावसाची अपेक्षा आहे. जर पावसाने उघडीप दिली तर मात्र दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
कृषी तज्ज्ञांचा सल्ला
सध्या राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पण शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये. जोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करु नये. पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. त्यामुळं शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी तज्ज्ञ
राज्यात 20.60 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी
राज्यात आत्तापर्यंत 20.60 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी (sowing) झाली आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी भर पडण्याची अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण सज्जता, खरीपाची कामे आणि केंद्र सरकार पुरस्कृत तसेच केंद्र सरकारी विभागांच्या योजनांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी पाऊस आणि सध्याची पेरणीची स्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यात सरासरीपेक्षा 39 टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र, जुलै महिन्यात, राज्यात उच्चांकी पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या: