Success Story : शेतकऱ्यांसमोर (Farmers) सातत्यानं विविध संकट येतात. मात्र, या संकटांना सामोर जात काही शेतकरी चांगल उत्पादन काढत आहेत. जालना (Jalna) जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील नासिर शेख (Nasir Sheikh) या शेतकऱ्यानं दोन एकरात सेंद्रीय पद्धतीनं पपईची (Organic cultivation of papaya) यशस्वी लागवड केली आहे. यातून त्यांनी सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी भरघोस उत्पादन घेतलं आहे.
पपईला 15 ते 18 रुपये प्रति किलोचा दर
नासिर शेख यांच्या 15 एकरात पारंपरिक पिकांबरोबर वर्षभरापूर्वी प्रयोग म्हणून दोन हजार पपई रोपांची लागवड केली होती. दोन रोपातील अंतर 8 बाय 6 फूट ठेवल्याची माहिती त्यांनी सांगितली. नोव्हेंबर महिन्यात तोडा सुरु झाला होता. आत्तापर्यंत साधारण 32 ते 35 टन पपईची त्यांनी विक्री केली आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत या पपईला 15 ते 18 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. नासिर शेख यांनी मल्चिंगचा वापर केला आहे. त्यामुळं पाण्याची मोठी बचत झाल्याची माहिती नासिर शेख यांनी दिली. खत व्यवस्थापन, कीडरोग नियंत्रण, आंतरमशागत अशा नियोजनासाठी त्यांना साधारण एक लाख रुपये खर्च आला आहे. आत्तापर्यंत त्यांना चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे तर अजूनही झाडांवर 35 टन माल शिल्लक आहे. यातून त्यांना तीन लाखांचं उत्पन्न अपेक्षित असल्याचे नासिर शेख म्हणाले. योग्य मार्गदर्शन आणि घेतलेल्या मेहनतीमुळे हे गोड फळ मिळाल्याचं शेख यांनी सांगितले. सेंद्रिय पपईला मोठी मागणी असते. राज्यासह देशातील इतर राज्यातही सेंद्रीय पपईला मोठी मागणी आहे. त्यामुळं दरात वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
काही भागात पपईवर रोगाचा प्रादुर्भाव
राज्यातील काही भागात पपई बागांवर डवणी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत. तर फळाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळं उत्पादनावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळं शेतकरी अडचणीत सापत आहेत. दरम्यान, बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळं नंदूरबार जिल्ह्यातील पपई बागा उध्वस्त होण्याच्या परिस्थितीत आहेत. कृषी विभागाच्या वतीनं पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या परिसरात या रोगांच्या नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचं प्रत्यक्षिक घ्यावीत अशी अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे. नंदूरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पपईवर पडणाऱ्या विविध रोगांमुळं हैराण झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: