Aquarius Today Horoscope 14 February 2023 : कुंभ आजचे राशीभविष्य, 14 फेब्रुवारी 2023: उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या बोलण्यातला सौम्यपणा तुम्हाला आदर आणि मान मिळवून देईल. शिक्षण आणि स्पर्धेत विशेष यश मिळेल. चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. यासोबतच तुमच्या राशीमध्ये सूर्य, शुक्र आणि शनि विराजमान आहेत. अशा स्थितीत ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. त्याचबरोबर आज भावंडांकडून आनंद आणि सहकार्य लाभेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? कुंभ राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य



कुंभ राशीचे आजचा दिवस कसा असेल? 


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल, परंतु तरीही, कार्यक्षेत्रात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अन्यथा, ते तुमचा विश्वासघात होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात. कुंभ राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिकांना आज चांगले परिणाम मिळतील. आज व्हॅलेंटाईन डे मुळे, व्यवसायात मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स असतील. ऑटोमोबाईल्समध्ये चांगला व्यवसाय होऊ शकतो. लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विक्री आणि विपणन क्षेत्रात कामाचा अधिक दबाव असेल. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण करतील.



कुंभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांच्या वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि दोघेही एकमेकांची काळजी घेतील. आज तुम्हाला भाऊ-बहिणींकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. आज नातेवाईकांशी वाद घालू नका, अन्यथा संबंध बिघडण्याचा धोका आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेम जीवन अधिक दृढ होईल, तसेच तुम्ही एकत्र फिरायला जाऊ शकता.



आज नशीब 69% तुमच्या बाजूने
कुंभ राशीच्या लोकांना आज लोकांशी बोलून लाभाच्या काही नवीन कल्पना मिळू शकतात. मित्रांसाठी भेटवस्तू खरेदी करताना खिश्याकडे लक्षात ठेवा. आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कठीण जाईल. नोकरदार लोकांच्या कार्यालयात सहकाऱ्यांसोबत काम केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमान चालिसाचे पठण करा.



आज कुंभ राशीचे आरोग्य
कुंभ राशीच्या लोकांना अपचनाची समस्या असू शकते. बाहेर तळलेले खाणे-पिणे याबाबत काळजी घ्या.



कुंभ राशीसाठी आजचे उपाय
धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा, सुंदरकांडाचा पाठ करा.



शुभ रंग - काळा, हिरवा
शुभ अंक - 2


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Capricorn Today Horoscope 14 February 2023: मकर राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात असेल प्रेम, आपुलकी! आरोग्याची काळजी घ्या