IPL 2023 Points Table : रविंद्र जाडेजाचा भेदक मारा आणि डेवॉन कॉनवे याचे वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबदचा सात विकेटने पराभव केला. हैदराबादने दिलेले १३५ धावांचे आव्हान चेन्नईने सात विकेट आणि आठ चेंडू राखून आरामात पार केले. चेन्नईकडून डेवेन कॉनवे याने नाबाद ७७ धावांची खेळी केली. चेन्नईचा हा यंदाच्या आयपीएलमधील चौथा विजय होय... हैदराबादचा पराभव करत चेन्नईने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. आठ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.  सीएसकेचा नेट रनरेट 0.355 इतका आहे.  


राजस्थान पहिल्या स्थानावर, लखनौ दुसऱ्या क्रमांकावर - 


पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे राजस्थान आणि लखनौ हे संघ आहेत. राजस्थानने सहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. राजस्थान, चेन्नई आणि लखनौ या संघाचे प्रत्येकी आठ आठ गुण आहेत. पण राजस्थानचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते पहिल्या स्थानावर आहेत. राजस्थानचा रनरटे 1.043  इतका आहे. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या लखनौचा रनरेट 0.709 इतका आहे. 


चार संघाचे सहा गुण - 
सध्या गुणतालिकेत चार संघाचे सहा गुण आहेत. यामध्ये गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघाचे सहा गुण आहेत.   पण रनरेटच्या आधारावर गुजरातचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबी पाचव्या, मुंबई सहाव्या आणि पंजाब सातव्या स्थानावर आहे.  


अखेरच्या तीन स्थानावर कोण ?
दिल्लीचा संघ तळाशी आहे. दिल्लीला सहा सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे. दिल्लीचे दोन गुण आहेत. नवव्या क्रमांकावर हैदराबादचा संघ आहे. हैदराबादच्या संघाचे फक्त चार गुण आहेत. आठव्या क्रमांकावर कोलकाता संघ आहे. कोलकात्याचेही चार गुण आहेत. कोलकात्याचा रनरेट हैदराबादपेक्षा चांगला आहे. त्यामुळे कोलकाता आठव्या क्रमांकावर आहे.  






सर्वाधिक धावा कोणाच्या ?
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस सध्या धावांच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. फाफ ने सहा सामन्यात ३४३ धावा चोपल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर आहे. वॉर्नरने सहा सामन्यात २८५ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा विराट कोहली आहे. किंग कोहलीने सहा सामन्यात २७९ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर चेन्नईचे डेवेन कॉनवे आहे. कॉनवेने सहा सामन्यात २५८ धावा केल्यात. पाचव्या स्थानावर जोस बटलर आहे. त्याने सहा सामन्यात २४४ धावा केल्या आहेत. 


गोलंदाजीत सिराजचा बोलबाला - 
गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. सिराजने चार सामन्यात 6.7 च्या इकॉनॉमीने १२ विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लखनौचा मार्क वूड आहे. त्याने ११ विकेट घेतल्या आहेत. राशिद खान आणि चहल यांनीही प्रत्येकी ११ विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शामी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दहा दहा विकेट घेतल्या आहेत.