Agri Machinery Scheme : शेतकरी (Farmers) सातत्यानं आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. देशातील विविध राज्यातील सरकारं देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, हरियाणा सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळं ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


शेतकऱ्यांना होणार फायदा


शेती क्षेत्रात सातत्यानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कमी खर्चात उत्तर शेती करण्यात येत आहे. याचाच विचार करुन हरियाणा सरकारनं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी पडवडणाऱ्या दरात शेतीसाठी लागणारी यंत्र सामुग्री खरेदी करु शकतात. जे शेतकरी आर्थिक अडचणींमुळं कधीही कृषी यंत्रे खरेदी करू शकत नव्हते, त्यांच्यासाठी हरियाणा सरकारनं घेतलेला निर्णय महत्वाचा आहे.


शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानं उत्पादन वाढलं


आज शासकीय योजनांचा लाभ घेत स्वस्त दरात कृषी यंत्रे दिली जात आहेत. यामुळं शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च कमी झाला आहे. उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढला आहे. ट्रॅक्टरच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कृषी उपकरणे किंवा कृषी यंत्रे जोडून, ​​शेतीची कामे फार कमी वेळात पूर्ण करता येतात. हरियाणा राज्यातील शेतकरी आता  3 लाख रुपयांचे अनुदान घेऊन ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. यासाठी, हरियाणा सरकारने अर्ज देखील मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणं गरेजेचं आहे.
 
31 जानेवारीपर्यंत हरियाणा सरकार शेतकऱ्यांना 55 प्रकारच्या कृषी यंत्रांच्या खरेदीवर अनुदान देत आहे. यामध्ये ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्क्यांचे अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.


काय आहेत अटी 


या योजनेत अर्ज करण्यासाठी वय किमान 18 वर्षे असणे अनिवार्य आहे.
जर तुम्ही मागील 7 वर्षात ट्रॅक्टर खरेदीवर अनुदानाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
जर तुमची सरकारने लाभार्थी म्हणून निवड केली असेल, तर 15 दिवसांच्या आत विभागाकडून अधिकृत ट्रॅक्टर कंपनीकडून ट्रॅक्टर खरेदी करावा लागेल.
ट्रॅक्टर खरेदी केल्याची पावती कृषी विभागाला दाखवावी लागणार आहे.
अनुदानावर ट्रॅक्‍टर विकत घेतल्यास त्यांना ट्रॅक्टर पाच वर्षे विकता येणार नाही. 
त्याच्या पडताळणीसाठी शेतकऱ्याला प्रतिज्ञापत्रही दाखल करावे लागणार 
शेतकऱ्याने 5 वर्षापूर्वी ट्रॅक्टर विकल्यास व्याजासह अनुदानाची रक्कम कृषी विभागाला परत करावी लागणार 


आवश्यक कागदपत्रे


शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या तपशीलाची प्रत किंवा बँक पासबुक
शेतकऱ्याचा कायमस्वरूपी खाते क्रमांक
शेतकऱ्याचे पॅन कार्ड
शेतकऱ्याचे आधार कार्ड
एससी प्रमाणपत्र
मेरी फसल पोर्टलवर नोंदणी
पासपोर्ट आकाराचा फोटो


महत्त्वाच्या बातम्या:


Haryana Govt : शेतकऱ्यांसाठी हरियाणा सरकारचा मोठा निर्णय, नैसर्गिक शेती करणाऱ्यांना मिळणार अनुदान