Hangover: सध्या बहुतांशी जण लग्न, पार्टी, वीकेंड किंवा इतर कोणत्याही प्रसंगी मद्याचे सेवन करतात. न्यू इयर सेलिब्रेशन (New Year Celebration) करतानादेखील जोरदार पार्टी केली जाते. पार्टी सेलिब्रेशननंतर दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास जाणवतो. डोकेदुखी, मळमळणे आदी प्रकारचा त्रास होतो. याला हँगओव्हर (Hangover) असेही म्हटले जाते. मद्याच्या अतिसेवनाने हा त्रास होतो.
हँगओव्हर हा अतिशय त्रासदायक ठरतो. तुम्हाला हँगओव्हरपासून सुटका हवी असेल तर तुम्ही घरगुती उपायदेखील वापरू शकता. घरगुती उपायाद्वारे (Home Remedies for Hangover) तुमचा हँगओव्हरचा त्रास कमी होईल.
पाणी
हँगओव्हरपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अधिकाधिक पाणी पिणे. अल्कोहोलमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण करते. वारंवार लघुशंकेला जाणे, उल्टी होणे आदींमुळे शरिरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा अधिकाधिक पाणी पिऊन आपले शरीर पुन्हा हायड्रेट करू शकता.
मध
हँगओव्हरची लक्षणे कमी करण्यासाठी मध हा एक चांगला उपाय आहे. मधामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे अल्कोहोलचे परिणाम कमी करण्यास मदत होते. मधामध्ये फ्रुक्टोज (Fructose) देखील आढळतो, जो साखरेचा एक प्रकार आहे. यामुळे शरीरातील हँगओव्हरची लक्षणे कमी होतात.
आलं
हँगओव्हर कमी करण्यासाठी आलं हा रामबाण उपाय आहे. आलंमुळे अल्कोहोल पचन करण्यास मदत करते आणि पोटातील दाह शांत होतो. त्यामुळे हँगओव्हरचा त्रास बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते.
केळी
अतिमद्यपान केल्याने तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता होते. हे पूर्ण करण्यासाठी केळी खाणे हा एक सोपा उपाय आहे. केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. केळी पोटाला आराम आणि एनर्जी लेव्हल वाढवण्यासही मदत करते.
टोमॅटो ज्यूस
हँगओव्हरपासून मुक्त होण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे टोमॅटोचा रस. त्यात फ्रुक्टोज (Fructose) असते. यामुळे अल्कोहोलचे जलद चयापचय करण्यास मदत होते. तसेच, व्हिटॅमिन सीचे प्रमाण हँगओव्हरपासून मुक्त होण्यास मदत करते.
हँगओव्हर उतरवण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी प्राशन करू शकता. लिंबू पाण्यामुळे तुम्हाला चांगला आराम वाटू शकतो. हँगओव्हर असतानादेखील नाश्ता, जेवण वेळेवर करा आणि भरपूर झोप घ्या. झोप पूर्ण झाल्याने आराम वाटू शकतो. रात्रीच्या सेलिब्रेशनमुळे हँगओव्हरचा खूपच त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.