Kolhapur News : कोल्हापुरात नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि जल्लोष हे नेहमीच समीकरण राहिले आहे. त्यामुळे सरत्या वर्षाचा थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करण्यासाठी कोल्हापूरकरांची (Kolhapur News) जोरदार तयारी सुरु आहे. शहरात सकाळपासून मटण, चिकन अन् मासे खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापुरात आज थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आज पब पहाटे पाचपर्यंत सुरु राहणारा आहेत. आज मद्यप्राशन करण्यासाठी एकदिवसीय पासही वितरित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्वच बिअर बार आणि परमीट रुम, देशी-विदेशी विक्री केंद्रावर दारू पिण्याचा हा एकदिवसीय परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे परवाने दुकानांत उपलब्ध आहेत. त्यामुळे रात्री अकरा-साडेअकरापर्यत खुले असणारे परमीटरूम बिअर बार 31 डिसेंबरला पहाटे पाचपर्यंत खुले राहतील. (bars will be open till 5 am) 


महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत सुरु राहणार 


दुसरीकडे, नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिकांना सहभोजनाचा आनंद घेता यावा यासाठी महापालिकेकडून (Kolhapur News) आज रात्री 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव उद्यान, पदपथ उद्यान, पद्माराजे उद्यान, नाळे उद्यान, शेळके उद्यान, पद्मावती उद्यान, मंगेशकर उद्यान, नेहरू बालोद्यान, रंकाळा चौपाटी, शाहू उद्यान, राजाराम हॉल उद्यान, दादासो शिर्के उद्यान, महावीर उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नाना-नानी पार्क, ताराबाई पार्क उद्यान, लालबहाद्दूर शास्त्री उद्यान, मुक्त सैनिक उद्यान, रुईकर ओपन उद्यान, सम्राटनगर उद्यान, टेंबलाई उद्यान, श्रीराम उद्यान, हुतात्मा पार्क उद्यान यांचा समावेश आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे करण्यात आले आहे. (Kolhapur News)


जिल्ह्यात 6 ठिकाणांवर तपासणी नाके 


कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात 6 ठिकाणांवर तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. गोव्यातून थर्टी फर्स्टच्या जल्लोषासाठी दारू तस्करी होण्याची शक्यता असल्यामुळे सीमाभागात तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. कागल चेकपोस्ट, चंदगडमध्ये तिलारी, आजरा रोडवरील गौसे तिट्टा, गगनबावडा येथे करूळ घाटात, राधानगरी येथे अभयारण्याजवळ फेजिवडे परिसरात आणि शाहूवाडीत आंबा घाटात पथके तैनात असतील. प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात आहे. दाजीपूर अभयारण्य आज 1 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या