Agriculture News : कापसाला मिळणाऱ्या कमी दरावरुन (cotton Price) शेतकरी आक्रमक झाले आहेत. विविध ठिकाणी आंदोलने करत आहेत. कापसाला 12 हजार रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीनं गेल्या तीन दिवसापासून जळगावमध्ये उपोषण सुरु होते. राष्ट्रवादी युवा अध्यक्ष रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांचे उपोषण सुरु होते. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मध्यस्तीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
दर नसल्यानं अद्यापही पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच
कापसाच्या दरासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे करुन दिल्यानंतर राष्ट्रवादी युवा अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. कापसाला यंदा भाव नसल्याने भाव मिळण्याच्या आशेने अद्यापही पन्नास टक्के शेतकऱ्यांनी आपल्या घरातील कापूस विक्रीस काढलेला नाही. त्यामुळं कापसाला 12 हजार रुपयांचा दर मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षाने या विषयावर आंदोलन सुरु केलं होतं.
कापसाला अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी युवा अध्यक्ष रवींद्र पाटील उपोषणाला बसलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी चर्चा करुन पुढील काळात कापसाला अनुदान देण्यासंदर्भात बैठक लाऊन, त्यासाठी अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेऊ असे आश्वासन रवींद्र पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर दिले. त्यानंतर रविंद्र पाटील यांनी उपोषण मागे घेतले.
साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्रासदायक
राज्यभरातील कापूस (Cotton) उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी (Farmers) गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून घरात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र आता हा साठवून ठेवेलेला आहे. मात्र साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरु लागला आहे. साठवलेल्या कापसात पिसवा वाढू लागल्याने, त्वचा विकार होऊ लागले आहेत. त्यासाठी काही शेतकऱ्यांना कापसावर फवारणी करावी लागत आहे. विशेष म्हणजे घरात फवारणी करताना त्याचा वेगळा धोका निर्माण होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: