Crime News : मुंबई पोलिसांनी (Crime News) दमदार कामगिरी (Mumbai police) केल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. लोणावळा येथील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी 30 वर्षापासून (Murder) फरार असलेल्या आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 युनिटने अटक केली आहे. आरोपी आपले नाव आणि ओळख लपवून मागील अनेक वर्षापासून मुंबईच्या विक्रोळी परिसरात राहत होता. अविनाश भिमराव पवार (49 वर्षे ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो विक्रोळी (Vikroli area)  परिसरात टुरिस्ट गाडी चालवण्याचे काम करत होता.


मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा येथील यशोधा बंगला, सत्यम सोसायटी, याठिकाणी वयोवृध्द असलेले दाम्पत्य धनराज ठाकर्सी कुरवा, (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी धनलक्ष्मी धनराज कुवा (वय 50 वर्षे) यांचा त्यांचे घरात घुसून दोरीच्या सहाय्याने गळा आवळून आणि धारधार शस्त्राने भोसकून निर्घुण खून करण्यात आला होता. लोणावळा शहर  पोलीसांनी अमोल जॉन काळे उर्फ टिल्लु व विजय अरुण देसाई या दोघांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी अविनाश भिमराव पवार (19 वर्षे) फरार झाला होता. लोणावळा पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु आरोपी मिळुन आला नाही.


आरोपी संदर्भात मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखा 9 नंबर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली.आरोपी स्वत:चे मूळ नाव आणि ओळख बदलून मुंबईत वावरत आहे. माहिती मिळाल्यावरून पथक नेमून आरोपीवर पाळत ठेवून त्याची माहिती मिळविली. आरोपीची एकंदरीत वागणुक संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता आपले नाव अविनाश भिमराव पवार असे सांगून तोच लोणावळा पोलीस ठाण्यातून फरार आरोपी असल्याचे आणि तो सध्या नाव बदलून अमित भिमराज पवार या नावाने विक्रोळी पूर्व याठिकाणी राहत असल्याची कबुली दिली आहे.


 पोलिसांची दमदार कामगिरी...


मुंबई पोलीस त्यांच्या कामगिरीत कायम तत्पर असलेलं आपण पाहिलं आहे. मोठ्या मोठ्या गुन्ह्यांचा छडा त्यांनी लावला आहे. त्यांच्या या उत्तम कामगिरीचं कायम महाराष्ट्रातून कौतुक होतं, अशीच कौतुकास्पद कामगिरी यावेळीदेखील केली आहे. 30 वर्ष फरार असलेला आरोपी पकडून त्याला अटक केली आहे. त्याच्यावर नजर ठेवून सापळा रचून त्याला जेरबंद करण्यात मुंबई पोलिसांनी यश मिळवलं आहे. 


 


संबंधित बातमी-


Pune Crime News : पुण्यात गाड्या चोरांचा सुळसुळाट, चोरीच्या 22 दुचाकी जप्त; 2 जणांना अटक