Success Story : शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी असतं तर कधी सुलतानी संकटं येतात. पण या संकटांचा सामना करत काही शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत. आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहे. अशाच एका शेतकऱ्यानं फुल शेतीचा प्रयोग (experiment in flower farming) केला आहे. या विशीष्ट पुलाच्या शेतीतून शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.  


रजनीगंधा फुलाची लागवड


हरियाणातील (Haryana) शेतकरी केवळ पारंपारिक पिकांच्या लागवडीतच नव्हे तर बागायतीमध्येही रस घेत आहेत. फुलशेतीतून रोज हजारो रुपये कमावत आहेत. अनेक शेतकरी तुम्हाला राज्यात पाहायला मिळतील. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहनही दिले जात आहे. प्रदीप सैनी या फरिदाबाद जिल्ह्यातील  शेतकऱ्यानं फुल शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. प्रदीप सैनी (Pradeep Saini) यांनी रजनीगंधा (Rajnigandha) फुलाची लागवड केली आहे. विशेष म्हणजे प्रदीप सैनी यांना राज्य सरकारकडूनही फुलशेतीसाठी प्रोत्साहन देखील मिळालं आहे. फुलशेतीसाठी त्यांना उद्यान विभागाकडून अनुदान मिळाले आहे. 


फुलांच्या शेतीबरोबरच फळबागांचीही लागवड


हरियाणातील शेतकरी फक्त गहू, धान आणि मोहरीचीच लागवड करतात असा लोकांचा समज आहे. पण तसे नाही. येथील शेतकरी आता इतर राज्यांतील शेतकऱ्यांप्रमाणे फळबागांमध्ये रस घेऊ लागले आहेत. राज्यात असे हजारो शेतकरी तुम्हाला आढळतील, जे फळबागातून मोठी कमाई करतात. प्रदीप सैनी हे पूर्वी पारंपारिक पिके घेत असत. पण आता ते फुलांची लागवड करत आहे. त्यामुळं त्यांचे उत्पन्न देखील वाढले आहे. विशेष म्हणजे आता जवळपासच्या गावातील लोकही प्रदीप सैनी या शेतकऱ्याकडून फुलशेतीच्या बारीकसारीक गोष्टी शिकू लागले आहेत.


प्रदीप सैनी हे पूर्वी गावातील त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर भात आणि गव्हाची शेती करत असत. पण खर्चाच्या तुलनेत त्यांना फायदा फारसा झाला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी रजनीगंधा फुलाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे प्रदीप सैनी यांना राज्य सरकारकडूनही फुलशेतीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. 


थायलंडमध्ये फुलांची निर्यात 


प्रदीप सैनी यांचे कुटुंब 1983 पासून रजनीगंधाची लागवड करत आहे. पण, नंतरच्या काळात त्यांना सरकारकडून अनुदान मिळाल्यानं त्यांचा नफा वाढला आहे. गाझीपूरच्या बाजारात फुले विकून ते दररोज 20 ते 30 हजार रुपये कमावतात. अशा प्रकारे ते दरमहा सुमारे नऊ लाख रुपये कमावतात. त्यांच्या मते, भात-गहू शेतीत रोजची कमाई नाही. पैसा हंगामात एकदाच येतात. पण फुलशेतीतून रोज पैसे मिळणात. प्रदीप सैनी यांच्या गावातील 250 शेतकरी कंदाची लागवड करतात. प्रत्येकजण फुले विकून चांगली कमाई करत आहे. या शेतकऱ्यांना फुलशेतीसाठी सरकार 24 हजार रुपये अनुदान देते. रजनीगंधाला वर्षभर बाजारात मागणी असते. त्यापासून औषधे आणि अत्तरे बनवली जातात. त्याचबरोबर भारतातून थायलंडलाही त्याचा पुरवठा केला जातो.


रजनीगंधा लागवडीचे प्रशिक्षण


हरियाणामध्ये, सरकार शेतकऱ्यांना रजनीगंध लागवडीचे प्रशिक्षण देते. जर तुम्हालाही रजनीगंधाची लागवड करायची असेल तर तुम्ही ती कोणत्याही हवामानात करु शकता. पण शेतात पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असावी. निचऱ्याची चांगली व्यवस्था नसल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ratnagiri : राजापूरमध्ये आढळलं दुर्मिळ फुल, पांढरी शुभ्र 'चोहोळा' प्रजातीची फुलं नष्ट होण्याच्या मार्गावर, खासियत काय? जाणून घ्या